सिरोंचा येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न.

214

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

शिवसेना जिल्हा प्रमुख, राजगोपाल सुलवावार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०८/२० रोजी सिरोंचा येथील विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी जिल्हा प्रमुख यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातीळ गावाच्या जनतेशी संपर्क साधून लोकांचे समस्या जाणून घेण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकाऱ्यानी जनसंपर्क अभियान राबवून जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यास शिवसेना कटिबध्द आहे , असे बैठकीत जिल्हा प्रमुखानी संबोधित करून आदेश दिले, अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तम कार्य करीत आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, इमानदारीने प्रामाणिकपने प्रत्येक वर्गाला न्याय देन्याचे कार्य मुख्यमंत्री महोदय करीत आहे, असेही याबैठकित जिल्हा प्रमुख यांनी कार्यकरत्याना मार्गदर्शन केले, सर्व शिवसैनिक पदाधिकारी कामात लागून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारीने कार्य करावे आपल्याला दिलेल्या पदाला न्याय द्यावे पद घेऊन पक्ष संघटन कार्य न केल्यास पक्ष कार्यवाही करण्यात येईल, आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी एक राहून काम करावे असे सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रियाज मोहम्मद शेख, तालुका प्रमुख दुर्गेश तोकला, ग्रामीण तालुका प्रमुख, नुकुम गट्टू, व्याकट्स्वामी पोलंपल्लिवर, रितेश मांचाला, अमित तीपत्तीवर, अब्दुल गणी, वाहिद मोहम्मद, संजीव तोटापल्लीवर, मोरे लाचॅना किरण रिककुला, महेंद्र सुलवावर , प्रफुल येरने, मनी कंता विमुला, वेणुगोपाल कोत्तवडलावर, सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित राहून सदर बैठक संपन्न झाली,