वर्धा नदीत नाव उलटुन 11 जण बुडाले, सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भिती, तिघांचे मृतदेह सापडले, शोधमोहीम सुरु

845

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-जिल्ह्यातील वरुड तहसिलअंतर्गत येणाऱ्या बेनोडा शहीद पोलिस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज 14 सप्टेंबरला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली असुन अद्याप 3 मृतदेह मिळाले आहेत सर्वच 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे
एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबाकडे दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आले होते काल दि 13 सप्टेंबरला दशक्रियेचा कार्यक्रम आटोपुन आज 14 सप्टेंबरला सकाळी 10 वाजताच्या सुमारास सर्वजण वरुडकडे फिरायला गेले महादेवाच्या दर्शनासाठी 11 हिजण वर्धा नदीत नावेने जात होते मात्र नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक अचानकपणे नाव उलटली व नावेतील 11 हि जण बुडाले यात बहीण, भाऊ, जावाई यांचा समावेश आहे सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भिती व्यक्त केल्या जात आहे
वृत्त लिहीपर्यंत 3 जणांचे मृतदेह शोधण्यात आले असून यात नावाड्यासह एक महिला व एका चिमुकलीचा समावेश आहे नागरिकांच्या मदतीने बेपत्ता असलेल्या 8 जणांचा शोध सुरु होता बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असुन नदीत बुडालेल्या 8 जणांचा बचाव पथकाद्वारे शोध मोहीम सुरु होती या घटनेमुळे बुडालेल्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे