बिबा येथील युवकाचा जंगलात शॉक लागून मृत्यू

208

 

चिखलदरा:- ( अबोदनगो चव्हाण)-

चिखलदरा:-
चिखलदरा तालुक्यातील बिबा येथील युवक रात्रीच्या वेळी जंगलात आपल्या गायी म्हशी शोधण्यासाठी गेला असता वासुदेव कलेसिंग धुर्वे (वय २२) याला शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या घरच्यांना व बिबा गावातील नागरिकांच्या लक्षात न आल्यामुळे जंगलात रात्री पासून ते सकाळ पर्यंत मृतदेह जंगलातच राहिला.
प्राप्त माहितीनुसार वासुदेव कलेसिंग धुर्वे बिबा येथील रहिवासी असून तो बिबा येथील नागरिकांचे गुरेढोरे चारत होता. रविवारी दिनांक १२ सप्टेंबर रोजी गुरे-ढोरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. संध्याकाळी घरी परत आल्यावर त्याची एक म्हशी न दिसल्यामुळे त्यांनी गावात शोध घेणे सुरु केले पण गावात न दिसल्याने. तो रात्रीच्या वेळी जंगलात पाहायला निघुन गेला.आणि वासुदेव जंगलातून परत आलास नाही त्याच्या घरच्यांनी आणि बिबा गावातील नागरिकांनी सकाळी सोधा सोध सुरु केली तर वासुदेवचा अखेर जंगलातच मृत्यू अवस्थेत सापडला आणि जंगलात म्हशी पाहता-पाहता रात्रीच्या वेळ असल्यामुळे जंगलात शॉक आहे कि नाही हे पण माहीती नसल्यामुळे जंगलात शॉक लागून वासुदेव धुर्वे यांचा मृत्यू झाला.
पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून.
सोमवारी दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे पोस्टमार्टम करण्यात आले आणि त्याचा शव त्यांच्या राहत्या घरी बिबा येथे पाठवण्यात आले असून. पुढील तपास चिखलदरा येथील थानेदार राहुल वाढवे यांचा मार्गदर्शनाखाली काटकुंभ पोलीस चौकीतील संजय तायडे, पवन सातपूते, निलेश भागवत करीत आहेत.