रत्नागिरी शहरातील खड्डे पाहुन चंद्र सुद्धा शरमला, ३-४ दिवस दर्शन नाही. रस्त्यावरून जाणारी लोक र.न.प त्याच बरोबर लोकप्रतिनिधींवर नुसता संताप व्यक्त करीत आहेत : राजू कीर

164

 

प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर.

रत्नागिरी : चंद्रावर खड्डे नसतील एवढे खड्डे सध्या रत्नागिरी शहरात पडलेले आहेत. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तथा आमदार यांची रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणुकिच्या दिलेल्या आश्वासनांवरची क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. व्हॉटसॲप वर सुद्धा ही क्लिप मोठ्या प्रमाणावर फिरत आहे .
डिसेंबर २० मध्ये आमदार उदय सामंत यांनी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांचे वडील ठेकेदार आर. डी. सामंत यांच्यावर डांबर चोरीच्या आरोपांवर उत्तर देताना मी आत्ताच मुंबईहुन ६० कोटी रुपये मंजुर करुन आणले आहेत. आचारसन्हिता संपताच रत्नागिरीतील रस्ते कॉंक्रिटीकरण होवुन पुढील २० वर्षात रत्नागिरीच्या रस्त्याला एकही खड्डा दिसणार नाही अन्यथा त्यानंतर शिवसेना मत मागायला रत्नागिरीकरांच्या दारात जाणार नाही असे ठामपणे सांगितले होते .
त्यांच्या या विधानावर विश्वास ठेवुन मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पडता पडता सावरले आणि त्यानंतर पुढची निवडणुक आली आणि याच रस्त्यांच्या खड्ड्यात मतदार पडायला लागले आहेत.
आमदार उदय सामंत आणि नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना रोज रत्नागिरीच्या जनेतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे . जनता उघडपणे आपला संताप व्यक्त करु लागली आहे . त्याचाच भाग या क्लिपच्या व्हायरल होण्यामागे दिसत आहे. लोकप्रतिनिधींची बाजु घेवुन बोलणारे नगरसेवक पदाधिकारी यावेळी मात्र मूक गिळुन गप्प रहाणे पसंद करत आहेत. कारण ते सुद्धा या परिस्थीतीने हतबल झाले आहेत असे ही राजू किर यांनी म्हटले आहे. खड्डे असणारे रस्ते, शहरात होणारा अपुरा पाणीपुरवठा, डासांचा प्रादुर्भाव, मोकाट गुरे नी उनाड कुत्रे यांचा उपद्रव पाहता आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी दखल न्यूज भारतशी बोलताना सांगितले.

*दखल न्यूज भारत*