मुख्य रस्त्यावर लागलेल्या गुरांच्या झुंजीत गाड्यांचे नुकसान. नगरपालिकेने सुरू केलेल्या उनाड गुरे पकडायची मोहीम आहे कुठे?

122

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :नगरपालिकेने जरी उनाड गुरे पकडायची मोहीम सुरु केली असली तरी शहरातील रस्त्यांवर गुरांचा उपद्रव सुरु असल्याचे दिसत आहे.काल सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोग्यमंदिर परिसर रस्त्यावर दोन गुरांची झुंज चालू होती. यामुळे येथे उभ्या करण्यात आलेल्या काही गाड्यांचे नुकसान देखील झाले आहे. तर गुरांची झुंज मुख्य रस्त्यावर चालू असल्याने परिसरात पादचारी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर काही काळ वाहनांच्या ही लांबच लांब रांगा दिसून आल्या. रत्नागिरी नगर परिषदेची उनाड गुरे पकडण्याची मोहीम सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र शहर परिसरात अनेक ठिकाणी ही गुरे रस्ते अडवून बसल्याचे चित्र सतत पाहायला मिळते त्यामुळे ही मोहीम आहे कुठे? असा सवाल शहरवासीय करत आहेत.
आरोग्य सभापती निमेश नायर यांना काही व्यापारी वर्गाने एक व्हिडीओ पाठवून याची कल्पना दिली आहे असे कळते. आता याबाबत काय उपाययोजना होणार? गुरे पकडण्याची मोहीम अधिक जलद होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*दखल न्यूज भारत*