… अन त्या मुलाच्या चेहऱ्यावर आले आनंद अश्रू. सुमारे २५ हजाची रक्कम असलेले पाकीट सामाजिक कार्यकर्ते भूषण कांबळे यांनी केले परत

108

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : आपले हरवलेले पैशाचे पाकीट मिळाले हे ऎकून स्वप्नील सावंत यांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू आले, मोठी रक्कम असलेले पैशाचे पाकीट हरवले आहे कुठेच मिळत नाही समजल्यावर स्वप्नील सावंत खूप बेचैन झाला होता,ऐन गणपती सणासुदीला हा प्रसंग ओढवल्याने सहाजिकच एखादा व्याकुळ होणारच.
महाराष्ट्रीय यादव चँरीटी ट्रस्ट चिपळूण शाखा कार्यकारिणी सदस्य, समाजसेवक श्री.भूषण भरत कांबळी यांचा प्रामाणिकपणा दि. १२ सप्टेंबर रोजी गुहागर बायपास रोड येथे एक पॉकेट रस्त्यावर आढळले त्यामध्ये अंदाजे रोख रक्कम व एटीएम कार्ड असे अंदाजे २५ हजार व फोटो काही कागद पत्र असा ऐवज होते फोटो व नाव उपलब्ध झाले मुळे व मित्र ओंकार रेळेकर यांच्याशी संपर्क साधून ते सती येथील स्वप्निल सावंत यांचा समजताच त्यांना परत देण्यात आले त्यांनी श्री.भूषण कांबळी आणि त्यांच्या परिवाराचे आभार मानले.
फोटो : पैशाचे पाकीट स्वप्नील सावंत यांना परत देतांना सामाजिक कार्यकर्ते भूषण कांबळे छायाचित्रात दिसत आहेत(छाया : ओंकार रेळेकर)

*दखल न्यूज भारत*