काद्रीं वार्ड क्रमांक पांच येथुन दहाचाकी ट्रक चोरी

56

 

पाराशिवनी :-कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री वार्ड क्रमांक ५ येथुन फिर्यादी याचे मालकीचा ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरुन नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १२ सप्टेंबर चे रात्री ११:०० वाजता ते सोमवार दिनांक १३ सप्टेंबर चे सकाळी ५ वाजता च्या दरम्यान फिर्यादी श्री . दर्शन रघुनंदन टिकम वय 30 वर्ष राहणार.कांन्द्री वार्ड नंबर ५ कन्हान ,याचे मालकीचा ट्रक क्रमांक एम.एच ४० बी.जी ५२५९ ज्याचा चेसिस नंबर. ४४४०२६ctz७११०७८ व इंजिन नंबर ६९७tc५७ctz८२१५०३ अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार चा ट्रक कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला. अश्या फिर्यादी श्री . दर्शन रघुनंदन टिकम यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक .३३९/२०२१ कलम ३७९ भादवि गुन्हा नोंद करुन तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात
पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे .