पहिल्याला घातला लाखोंचा गंडा व बोहल्यावर चढण्यासाठी दुसऱ्याला दिला फंडा. पहिला बिचारा एकदम झालाय थंडा

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

कोरपना तालुक्यातील सचिन सुधाकर बोबडे वय २७ वर्षे हा कुणबी समाजाचा मुलगा
शेतकरी असून, कोरपना तालुक्यातील रहीवासी आहे. परिसरात त्याने पेट्रोल पंप मिळवण्यासाठी विचार केला. परंतू पेट्रोल पंप आदिवासी महिलेसाठी राखीव असल्याने पेट्रोल पंप मिळवण्यासाठी एखाद्या आदिवासी मुलीला पत्नी करावी लागेल या काहिंच्या सांगण्यावरून गावनात्याने असलेले काका रघूनाथ नवले, किशोर आत्राम, बंडू टेकाम रा. राजूरा यांनी मला मोहाळी (नले.) ता. सिंदेवाही येथे आदिवासी मुलीबाबत माहिती दिली. त्यानुसार मी त्यांना घेऊन मोहाळी (नले.) हे गाव गाठले. व तेथील साईबाबा ट्रस्ट, चंद्रपूर चे सदस्य असलेले सरपंच/उपसरपंच व सदस्य आणि कुमारी रविना नंदलाल मडावी वय १९ वर्षे हिचे आई वडील व नातेवाईक यांचे सोबत लग्नाबाबत मिटींग घेऊन, विचाराअंती लग्न करण्याचे ठरले. त्यानंतर दि.- १/७/२०२० रोजी मुलगी, मुलीचे आई- वडील व नातेवाईक यांचे साक्षीने साईबाबा मंदिर नविन दाताळा येथे आम्हा दोघांचा आंतरजातीय विवाह संपन्न झाला. तेव्हापासून मी पत्नी रविना हिचे सोबत किरायाची रुम घेऊन, पुरूषोत्तम मुजूमदार माता मंदिर जवळ, राजूरा येथे राहत होता. अशातच दि. १०,११/७/२०२० रोजी पहिला सन आकाडी निमित्ताने पत्नी रविना सोबत मोहाळी (नले.) येथे आला. परंतु लॉकडाऊन मुळे सासुरवाडीलाच थांबला असल्याचे त्याने सांगितले.
येतांना, तो श्रीकांत नथ्थु पाचभाई रा. वडगांव ता. कोरपना यांना दो एकर शेती विकल्यापैकी ३,५०,०००/- रुपये पत्नी रविनाजवळ दिले होते. त्याचे आईचे वर्षश्राद्ध असल्याने व पत्नीकडील पैसे खर्च करायचे नसल्याने, त्याने श्रीकांत पाचभाई यांना फोनद्वारे सांगून पत्नी रविना सचिन बोबडे या नावाने असलेल्या बॅंक खात्यावर रुपये ५,०००/- ट्रान्सफर करन्यास सांगितले व ते खाते क्रमांक- 60081652444 बॅंक अॉफ महाराष्ट्र शाखा कळमगांव (गन्ना) येथे जमा झाल्याने बॅंकेत जाऊन दोघांनी पैसे काढून, आईचे वर्षश्राद्ध उरकन्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च पण केले. आणि दुपारी ३-३० चे सुमारास त्याने पत्नीला लवकर स्वयंपाक करण्यास सांगुन घरीच थांबला होता असे त्याचे म्हणणे आहे.
त्याचे सासरे‌ नंदलाल मडावी हे गावातील शाळेजवळ काम करीत होते. तेव्हा अंदाजे ४-०० वाजता माझी पत्नी सौ. रविना सचिन बोबडे ही माझे बाबाला मोबाईल फोन नेऊन देतो म्हणून, एक हिरव्या रंगाची कापडी पिशवी हातात घेऊन घरातून निघून गेली. ती घरी येईल व स्वयंपाक करून मला जेवन देईल या आशेने तो तिची वाट पाहत राहिला. परंतु सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने, तो स्वत: सासू, सासरे व गावातील नातेवाईक यांनी शोधाशोध केली. परंतु ती मिळून न आल्याने दुसऱ्या दिवशी पो. स्टे. सिंदेवाहीला तशी तक्रार दाखल केली. ती जातांना सोबत तिचेकडे असलेलेज्ञ पेट्रोल पंप चे डिमांड करिता ठेवलेले रुपये ३,५०,०००/- व सासुसासऱ्यांनी बचत गटातून कर्जाने घेतलेले १०,०००/- रुपये असे एकूण ३,६०,०००/- ( तिन लाख साठ हजार रुपये) घेऊन गेली असल्याने त्याचे पेट्रोल पंप मिळवण्याचे स्वप्नच भंग झाले असल्याचे त्याने बोलून दाखवीले. नंतर कांही वेळाने कळले की, ती तिचा जुना प्रियकर निकेश उर्फ गुड्डू यांचे सोबत दि.२७/७/२०२० रोजी पळून गेली असून, तिने तिकडे दोघांनीही लग्न लावल्याचे माहित झाल्याने, मंदिरात तिचे आई-वडील व नातेवाईक यांचे समक्ष आंतरजातीय लग्न करूनही लाखो रुपयाने फसवणूक झाल्याची खंत व्यक्त केली.