देव तारी त्याला कोन मारी! युवासेनेचे अजिंक्य शेन्डे यांच्या सतर्कतेने एस.टी.बस चे पाठलाग करून वाचले प्रवाशांचे प्राण

308

 

वणी : परशुराम पोटे

वणी बस स्थानकावरुन चंद्रपुर ला निघालेल्या बसचे चाक निखळुन पडणार असल्याची बाब युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेन्डे यांचा लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत बसचा पाठलाग करून बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु बस थांबत नसल्याचे पाहुन अखेर एल.टी.कॉलेज जवळ बसच्या समोर आपली दुचाकी आडवी लावुन बस थांबविली. त्यामुळे मोठा अपघात टळल्याने “देव तारी त्याला कोन मारी” अशी म्हण या घटनेने खरोखर लागू पडली.
सविस्तर असे की, रविवार दि.१२ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास वणी बसस्थानकावरून वणी ते चंद्रपूर हि वरोरा मार्गे जाणारी बस वणी आगारातून निघाली. त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात बस थांबली व काही प्रवाशी बसविण्यात आले. त्यानंतर बस वरोरा मार्गे निघाली व काही अंतरावर या बसच्या समोरचे डाव्या बाजूचे चाक जोरजोरात हालत होते. ही बाब चालक किंवा वाहकाच्याही लक्षात आली नाही. याचवेळी
काही कामानिमित्त एसडीओ बंगल्यासमोरील ट्रॅव्हल्स पाइंट जवळ उभे असलेले अजिंक्य शेंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच दुचाकीने या बसचा पाठलाग केला. तोपर्यंत बस लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पुढे निघून गेली होती. अजिंक्यने बस ला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु बस थांबत नसल्याचे
अखेर माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या घरापुढे बसच्या समोर दुचाकी आडवी लाऊन बस थांबविली आणि बसचे चाक जोरजोरात हालत असल्याचे अजिंक्यने चालक राजेश तुकाराम आत्राम व वाहक अनिल गजलवार यांच्या
लक्षात आणून दिले. त्यानंतर प्रवास्यांना बसच्या खाली उतरविण्यात आले. खाली उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी अजिंक्य चे मनापासून आभार मानले. त्यानंतर काही
वेळातच वणी आगारातून दुसरी बस मागविण्यात आली. त्या बसमध्ये सर्व प्रवासी बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. अजिंक्य शेंडे हा युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख असून सामाजिक कार्यात तो नेहमीच अग्रेसर असतो हे विशेष!