Home Breaking News विदर्भ TV तर्फे 15 आँगस्ट ला दखल न्युज भारत चे कार्यकारी संपादक...

विदर्भ TV तर्फे 15 आँगस्ट ला दखल न्युज भारत चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांचा कोव्हीड योद्धा म्हणून होणार जाहीर सत्कार

337

 

दखल न्युज भारत टीम नागपूर:

महादुला-कोराडी / नागपुर :8 आँगस्ट 2020
नागपुर जिल्ह्यातील सर्वात जास्त बघितले जाणारे विदर्भ TV या लोकप्रिय आँनलाइन न्युज चैनल तर्फे दखल न्युज भारत पोर्टल चैनल चे नागपुर जिल्ह्यातील कार्यकारी संपादक सुनील साळवे यांची कोरोना योद्धा पुरस्कार 2020 साठी निवड झाली असुन येत्या 15 आँगस्ट 2020 ला त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
विदर्भ TV च्या न्युज स्टुडिओ च्या कार्यालयाचे उद्घाटन महादुला-कोराडी येथे सोनेकर काँलेज समोर समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई संचालक हुकुमचंद आमधरे, कोराडी जि.प सर्कल सदस्य नानाभाऊ कंभाले, संपादक विदर्भ TV महेश नागपुरे तसेच संचालक विदर्भ TV सचीन मुन आदी मान्यवर उपस्थित राहणार असून
या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ TV चे ग्रामीण हेड शैलेश ढोरे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमांत न्युज स्टुडिओ च्या उद्घाटनासोबतच कोरोना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता पत्रकारिता व सामाजिक, तसेच आरोग्य, स्वच्छता कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या या मान्यवरांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. कोरोना योद्धा म्हणून पत्रकार व समाजसेवक सुनील साळवे, पं. स. सदस्य व पत्रकार राहुल तिवारी, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजिर शेख, गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, विदर्भ मेल चे पत्रकार मुकेश हेडाऊ, डॉ. कमलाकर देवघरे, पत्रकार राजेश खंडारे (विदर्भ स्टार TV) स्वच्छता कर्मचारी नरेश मेश्राम ई. यांचा सत्कार होणार अशी माहिती विदर्भ TV चे ब्युरो चीफ शैलेश ढोरे यांनी सांगितले.

Previous articleखुंटगाव परिसरातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली पाहणी
Next articleपहिल्याला घातला लाखोंचा गंडा व बोहल्यावर चढण्यासाठी दुसऱ्याला दिला फंडा. पहिला बिचारा एकदम झालाय थंडा