7 वर्षीय बालिकेवर 20 वर्षाच्या तरुणाकडून अत्याचार, वनोजा येथील घटना, आरोपीस अटक, तिन दिवसाची पोलिस कोठडी

561

युवराज डोंगरे/खल्लार
रहीमापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या गावातील तरुणाने ७ वर्षीय बालिकेवर लैंगीक अत्याचार केल्याच्या घटनेने दर्यापुर तालुक्यासह अंजनगाव तालुक्यातही खळबळ माजली.
प्राप्त माहीतीनुसार पोटाची खळगी भरण्याकरीता आई वडील आजी आजोबाकडे 7 वर्षीय चिमुरडीस सोडुन शेतात मजुरी करीता गेले होते. पिडीत बालिका लेंडी नाल्याच्या बाजुने शौचास गेली असता २० वर्षीय नराधम शिवम प्रदिप पातोंड हा दुचाकीवरुन शेतात जात होता. आपण गवताला शेतात जाऊ असे सांगुन दुचाकीवर बालिकेस बसवुन शेतात नेले असता कापुस पिकाच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली दुष्कर्म केले.
आई वडील घरी आले असता पिडीत बालिका रडत असल्याचे दिसल्याने चौकशीअंती माहीत झाल्याने पिडीतेच्या आईने तक्रार देण्यासाठी रहिमापूर पो स्टे गाठले दिलेल्या तक्रारीवरुन भादवि 363, 366, 376,अ ब लैंगीक बाल अत्याचार प्रतिबंधक सरक्षण अधिनियम 2012 अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये घटनास्थळाचा पंचनामा करुन रात्री 3 वा. गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव यांच्या मार्गदर्शनात सुरु असुन नराधमास अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांनी दिली
येवदा येथील घटनेची शाई वाळत नाही तेच राहिमापूर येथील घटना घडली असल्याने अश्या नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे