वणीत मुर्तीकार संघटनेच्या वतिने यवतमाळचे प्रसिद्घ मुर्तिकार स्नेहल बनकर यांना श्रद्धांजली

18

 

वणी : परशुराम पोटे

यवतमाळ शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार स्नेहल बंडू बनकर यांचे शुक्रवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले ते गेल्या काही दिवसापासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कामात व्यस्त होते. मुर्त्या बनविल्या नंतर अखेरचा हात ठेवत असतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे वय 50 वर्षाचे होते.
वणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बुरडकर , उपाध्यक्ष नत्थु डुकरे , प्रवीण बोरसरे , सुहास झिलपे , सुभाष झिलपे, मनोज बुरडकर , शेख शरीफ , विठ्ठल डुकरे , गौरव विश्वकर्मा , रवींद्र पाटाळकर व सोबतच शहरातील पोलीस खात्यात कार्यरत असलेले कलाप्रेमी, वारली चित्रकार शेखर वांढरे हे देखील उपस्थित होते.