नागपूर शहरातील इतवारी आणि मस्कासात भागातील किराणा दुकानें शनिवारी आणि रविवारी बंद राहणार

140

पूजा उईके रामटेक तालुका प्रतिनिधी नागपूर शहर:

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने इतवारी आणि मस्कासात होलसेल किराणा ओस प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय इतवारी आणि मस्कासात होलसेल किराणा बाजार अससोसिएशनचा चालकाकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय किराणा होलसेल दुकानदार आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या प्रकृतीला काही हानी होऊ नये यादृष्टीने घेण्यात आला आहे. यापुढे कोणतेही सूचना येईपर्यंत दोन्ही किराणा ओस शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहेत. कोरोनामुळे सध्या किराणा मालाची मागणी जास्त असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर किराणा दुकानामध्ये गर्दी करतात. परिणामी ग्राहक दुकानदार आणि कामगार यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.