ब्रेकिंग न्यूज…… कुख्यात दरोडेखोर टोळीला शिरपुर पोलीसांकडुन अटक

96

 

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या, गावामध्ये दिड दवसाच्या गणपतीच्या विसर्जना संदर्भात शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालत असतांना गुप्तहेरांकडुन मिळालेल्या माहितीवरून कळमना ते शिंदोला रोड वरील बंद अवस्थेत पडलेल्या शालिवाहणा एनर्जी लिमिटेड इथे, काही इसमांनी दरोडा टाकण्याचा कट रचल्याची गोपनीय माहिती दि.११ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजताचे सुमारास शिरपूर पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या गणवेशा मध्ये पोलीस कर्मच्यारी शालिवाहना कंपनी जवळ दबा देऊन बसलेले होते. दरम्यान रात्री ११:३० वाजताच्या सुमारास शालिवाहणा कंपनी नजीक एक चार चाकी वाहन येऊन उभे राहिले. त्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनांमधून तीन इसम बाहेर निघाले. आणि कंपनीची तार तोडून त्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश केला. ही संधी बघत साध्या गणवेशा मध्ये दबा धरून बसलेल्या पोलीस कर्मचार्यांनी ,दरोडेखोरांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान उभ्या असलेल्या पांढ-या रंगाच्या वाहनातील ईतर काही दरोडेखोर,अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्यात यशस्वी झाले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी मोहसिन निसार शेख(२३), शाहरूख शहादतुल्ला (२४), ताहीद अहमद कुरेशी, (२२) सर्व रा. घुग्गुस असे सांगीतले. त्यांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी कोयता,कुऱ्हाड, दोरी, दोन लोखंडी आरीपत्ते व मोबाईल असा २७ हजार शंभर रुपयाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. दरोडेखोरांना विश्वासात घेऊन ,विचारपुस केली असता, त्यांनी सदर कंपणीत मौल्यवान साहीत्य चोरी करण्याच्या कट रचुन,कंपणीचे सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यास त्यांना धमकी देवुन ,सोबत असलेल्या हत्यारांनी जखमी करण्याचा कट असल्याचे उघड केले. तसेच पळुन गेलेल्या आरोपींचे नाव अजय नायक, जानी व कौशल असल्याची माहिती दिली.
सदरची कारवाही, पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील- भुजबळ, अपर पालीस अधिक्षक डाॅ. खंडेराव धरणे, उपविपोअधि/ प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन लुले, पोउपनि /राम कांडरे, पोना/ प्रमोद जुनुनकर, गुणवंत पाटील, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, आशीष टेकाडे, अभिजित कोशटवार, यांनी पार पाडली.