बिग ब्रेकिंग अन….. सुकाळ्यात शिरला वाघ उडाली एकच खळबळ

829

 

हर्ष साखरे उपसंपादक

सुकाळा:- आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथे वाघाने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार आज सायंकाळच्या सातच्या सुमारास गावांमध्ये वाघ प्रवेश केल्याचे नागरिकांना आढळून आले .सदर वाघ संभाजी जिल्हेवार यांच्या घराकडून BSNL टॉवरकडे गेला अशा प्रत्यक्षदर्शी संभाजी जिल्हेवार यांनी सांगितले. या घटनेमुळे गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे . ज्या रस्त्यावरून वाघ गेला आहे त्या ठिकाणी त्यांचे ठसे उमटले असून नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे . ठसे बघण्याकरिता घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सुकाळा, शिवनी खुर्द, मोहझरी येथील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे .त्यामुळे रात्रौ एकट्याने बाहेर फिरू नये.शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीवर जात असताना काळजीपूर्वक बघूनच जावे अशी सूचना नागरिकांना दिली जात आहे.

तरी वन विभागाने तात्काळ या घटनेची सत्यता पडताळून या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक वन विभागाकडे केली आहे.