निवळी ग्रामपंचायत सदस्य संजय निवळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष पदी निवड.

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : कोरोनाच्या महामारीमध्ये एक कार्यतत्पर कोविड योध्या म्हणून नावलौकिक मिळालेले रत्नागिरी तालुक्यातील निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री संजय निवळकर यांची भारतीय जनता पार्टी कडून रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.पक्षाकडून जबाबदारी मिळताच श्री निवळकर यांनी हातखंबा जिल्हा परिषद गटामधील वाडी-वस्तीत जाऊन सर्व भाजपा कार्यकर्त्यांची व प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच जिल्हा परिषद गटातील कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणे संदर्भात चर्चा केली. पक्षाने ठेवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून जिल्हा परिषद गटात संघटनात्मक कार्याला भर देणार असल्याचे यावेळी श्री संजय निवळकर यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबाबत विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.