येवदा येथील महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजरला सुद्धा कोरोना ची लागण दर्यापूर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 45 वर

0
104

 

लेहेगाव व येवदा येथे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आज 1 वाजेपर्यंत कोरोना चाचणी अहवाल हाती आला असता एकूण रुग्ण संख्या दर्यापूर तालुक्याची 45 वर गेली आहे
दर्यापुर तालुक्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा लक्षात घेता एकूण रुग्ण संख्या 45 वर गेली आहे आज दुपारपर्यंत ग्रामीण भागात तीन व शहरी भागात तीन कोरोणा संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत दर्यापूर तालुक्यासाठी हे चिंतेची बाब आहे प्रत्येक घरापर्यंत कोरोना पोहोचत असल्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे क्रमप्राप्त ठरेल प्रशासनाच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी भागातील कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे सुरू आहे व तेथील संपूर्ण परिसर सिल व सँनिटाईज करण्यात येत आहे हे संपूर्ण जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे तालुक्यातील कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता चिंतेची बाब ठरत आहे सर्व नगर व सर्व ग्रामीण भाग हा कोरोनाच्या विळाख्यात आला आहे.
दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)