महादुला नगरपंचायत अंतर्गत लाँक डाऊन मध्ये त्रस्त गोरगरिबांना अन्नधान्य किट्स चे वाटप

0
255

 

दखल न्यूज भारत टीम नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर : ७ आँगस्ट २०२०
लाँक डाऊन मध्ये धंदे ठप्प झाले. रोजगार बुडाले. मात्र अशावेळी महाराष्ट्र शासनाला या गोरगरीब मजुरांना अन्नधान्य किट्स वाटप व्हावे याकरिता महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांचे माध्यमातून वारंवार पाठपुरावा केल्या नंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्र शासना कडून गरीब लोकां करीता पाठविण्यात आलेल्या धान्याचे किट चे वितरण आज महादुला नगरपंचायत अंतर्गत विभिन्न वार्डात करण्यात आले.
सिध्दार्थ नगर व फुले नगर महादुला या भागात महादुला नगरपंचायत चे वार्ड क्रमांक ९ चे नगरसेवक तिलकचंद गजभिये(कोव्हीड योद्धा) , माजी नगरसेवक रत्नदीप जी रंगारी(कोव्हीड योद्धा) तसेच सामाजिक कार्यकर्ते व दखल न्युज भारत पोर्टल चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे(कोव्हीड योद्धा) यांच्या हस्ते येथील गोरगरीब मजुरांना अन्नधान्य किट्स चे वाटप करण्यात आले. या अन्नधान्य किट्स चे वाटप करताना नगरपंचायत कर्मचारी, तसेच पोलीस हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.