Home चंद्रपूर  चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी न सोडवताच हाकलण्यात आले…… अतिथीगृह...

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी न सोडवताच हाकलण्यात आले…… अतिथीगृह नागपूर येथील बैठकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत व चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार-आमदार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना दिला अत्यल्प प्रतिसाद…….

261

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तसेच नामदार विजय वडेट्टीवार व जिल्ह्यातील खासदार आमदार यांनी नागपूर येथे अतिथीगृह बिजलीनगर या ठिकाणी बैठकीसाठी बोलविले होते. बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आपली बाजू मांडली परंतु वरील शिष्टमंडळांनी बोलले की सर्वप्रथम तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि चिमणी वर चढलेले लोक यांना खाली उतरवा नंतरच आम्ही बैठकीत बोलू अशी हेकेखोरीची भाषा वापरली. शिष्टमंडळांनी प्रकल्पग्रस्तांना बाहेर जाण्याचा आदेश दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त बाहेर निघाले तसेच बैठकीमध्ये न्याय मिळेल यासाठी सायंकाळपर्यंत बाहेर वाट बघत राहिले. प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत होते की, पालकमंत्री, ऊर्जा मंत्री, खासदार, आमदार प्रतिसाद देतील परंतु सायंकाळपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही. आणि शिष्टमंडळाने त्यांची बाजू न ऐकताच ही बैठक विफल झाली म्हणून प्रकल्पग्रस्तांवर ताशेरे ओढल्या गेले. प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगार यांनी विधायक पद्धतीने शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रश्न सोडवू अशा तयारीत होते परंतु शिष्टमंडळाची हेकेखोरी व गर्वाची भाषा असल्यामुळे प्रकल्पग्रस्त मध्ये नाराजीचे वातावरण आणि आक्रोश निर्माण झालेले आहे. प्रकल्पग्रस्त न्याय मागत असताना शासन व प्रशासनाचे लोक प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही मागणीला साथ देत नाही. प्रकल्पग्रस्त चिमणी वर तीन दिवसापासून चढून आहेत परंतु त्यांचाच हक्क त्यांच्यापासून नाकारण्याचे काम ऊर्जामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच जिल्ह्यातील खासदार आमदार करत आहेत ही अत्यंत निंदनीय बाब असून जेव्हा पर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत प्रकल्पग्रस्त आंदोलन बंद करणार नाही असेही प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी ठरविले आहे.

Previous articleसत्रापुर कन्हानचा एका वृध्द कोरोना रूग्णाचा मुत्यु कन्हान ला ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १५६ रूग्ण कन्हान परिसर १५६, पारशिवनी २९ रूग्णासह तालुका १८५
Next articleमहादुला नगरपंचायत अंतर्गत लाँक डाऊन मध्ये त्रस्त गोरगरिबांना अन्नधान्य किट्स चे वाटप