सत्रापुर कन्हानचा एका वृध्द कोरोना रूग्णाचा मुत्यु कन्हान ला ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १५६ रूग्ण कन्हान परिसर १५६, पारशिवनी २९ रूग्णासह तालुका १८५

235

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोविड-१९ संसर्ग रोगाचा पाचव्या महिन्यात प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन सत्रापुर कन्हान येथील ६३ वर्षीर्य वृध्द (दि.३०) जुलै ला कोरोना बाधित झाल्याने मेयो नागपुरला उपचारा दरम्यान प्रकृती खालावुन आठव्या दिवसी आज (दि.७) ला त्याचा मुत्यु झाला. याअगोदर पटेल नगर कन्हान चा भाजीपालावाल्यास उपचारास नागपुर नेतानाच मेयाे नागपुरला (दि २०) ला पहिला मुत्यु पावला होता. तर दुसरा (दि.३१) जुलै ला जवाहरनगर कन्हानचा एका वृध्दाचा रात्री मुत्यु झाला . आणि आज (दि.७) ऑगस्टला सत्रापुर कन्हान चा एका ६३ वर्षीय वृध्दाचा मुत्यु झाल्या ने कन्हानचे आता पर्यंत तीन व कांद्रीचे दोन असे पाच लोकांचा कोरोनाने मुत्यु झाला आहे.
दि.०६ आगस्ट २०२० पर्यंत १५१ रूग्णासह पारशिवनी २९ असे तालुक्या त १८० रूग्ण आढळले. आज (दि.७) ला मुकबंधिर शाळा कांद्री ला २६ लोकां ची रॅपेट तपासणी करण्यात आली. यात हनुमान नगर ४ व कन्हान १ असे कन्हान चे ५ पॉझीटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान परिसर १५६ म्हणजे दिड शतक पार केले. पारशिवनी येथे ४६ लोकांची रॅपेट तपासणी केली. यात सर्व निगेटिव्ह आढ ळल्याने पारशिवनी ० असे तालुक्यात ५ रूग्ण आढळुन तालुक्याची एकुण १८५ रूग्ण संख्या झाली आहे. यात शुक्रवार (दि.७) ला कन्हान ९१ पिपरी २५, कांद्री २४, टेकाडी को.ख ०७, बोरडा ०१ व मेंहदी ८ असे कन्हान परिसर १५६ व पारशिवनी २९ असे एकुण तालुक्यात १८५ रूग्ण झाले आहे. यात कन्हान ३ व कांद्रीचे २ रूग्णाचा मृत्यु झाला.
सत्रापुर कन्हान चा एका वृध्दाचा उप चारा दरम्यान आठव्या दिवसी मेयो दवा खाना नागपुर ला मुत्यु झाल्याने कन्हान शहरात भितीचे वातावरण निर्माण होत आहे.