कोरोनाच्या पाश्वभूमीवर पूर्वीपासून परंपरागत असलेला वेहेरगाव (वाघापूर) येथील सावळू बाबा आणि मरी माता यात्रा महोत्सव रद्द.

113

 

छगन कोळेकर ता.साक्री जि. धुळे प्रतिनिधी 9823812416,9545662216

वेहेरगाव (वाघापूर) ता. साक्री जि. धुळे येथे दरवर्षी रक्षाबंधन नंतर पाच दिवसांनी सावळू बाबा च्या नावाने मोठ्या यात्रेचे आयोजन होत असते परंतु यावर्षी कोरोना या साथीच्या आजारामुळे शासनाने यात्रा महोत्सव, तसेच धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातलेली आहे. तसेच कोरोना ग्रामस्तरीय समिती वेहेरगाव यांनी याबाबत गाव दवंडी देऊन नागरिकांना अवगत केलेले आहे. तसेच बाहेरच्या गावाहून येणाऱ्या मांता, नवस अशा कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा कोरोना ग्रामस्तरीय समितीने परवानगी नाकारलेली आहे.
तरी याचे उल्लंघन झाल्याचे समितीच्या निदर्शनास आल्यास संबंधितांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -1987 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा पूर्व सूचना *ग्रामपंचायत वेहेरगाव (वाघापूर) चे सरपंच श्रीमती. सयाबाई तुकाराम कोळेकर , पोलीस पाटील श्री. उत्तम लहानू मारनर तसेच ग्रामसेवक श्री. शरद वाघ आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी दिल्या आहेत.*
तरी याबाबत माळमाथा परिसरातील सर्वांनी याची नोंद घ्यावी…. पोलीस पाटील श्री. उत्तम मारनर दखल न्युज चे तालुका प्रतिनिधीशी. बोलताना सांगितले.