Home मुंबई क्रीडा विषयाचा समावेश दिक्षा ॲप मध्ये करणार – शिक्षण संचालक दिनकर पाटील...

क्रीडा विषयाचा समावेश दिक्षा ॲप मध्ये करणार – शिक्षण संचालक दिनकर पाटील शिक्षणाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा शुभारंभ

214

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्यूज भारत’

मुंबई, दि. ७ : कोरोना सारख्या विचित्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोग प्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे. ही रोग प्रतिकारक शक्ती योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारातून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत महत्वाची व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्वाची आहे. शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले ई कंटेंट हे दिक्षा ॲप व जिओ टीव्ही चॅनलवर घेण्यात येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासन घेईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तथा शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले. महाराष्टात संघटना स्तरावर प्रथमच असा प्रयत्न झाला असल्याचे नमुद करून शारीरिक शिक्षक संघटना, व तंत्रस्नेही पॅनलचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलं द्वारा निर्मीत शारीरिक शिक्षण ई कंटेंटच्या शुभारंभ दिनकर पाटील यांच्या शुभहस्ते झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.

शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त यांनी शारीरिक शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून सुदृढ व हेल्थी समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमातून शासनाचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे मत व्यक्त केले व तंत्रस्नेही पॅनलच्या कार्याचे कौतुक केले. तर शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागात समन्वय राहिल्यास भारताचा आधारस्तंभ असलेला विद्यार्थी सुदृढ झाला तर कोरोना सारख्या कितीतरी महामारीला तो पळवून लावेल असे मत सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २२० शारीरिक शिक्षकांना एकत्रित करून सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास ४९ विविध विषयाचे पॅनल तयार करून तंत्रशुद्ध ई कंटेंट तयार करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून गुगल फॉर्म लिंकद्वारे सुरक्षिततेचा विचार करून ऑनलाईनचा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु कसा केला या बाबतची माहिती ज्यांच्या अथक प्रयत्नाने तंत्रस्नेही पॅनल तयार झाले असे महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मान्यवरांना देत शारीरिक शिक्षकांच्या संचमान्यता, खेळाडू अपघात विमा, निवड श्रेणीसाठीच्या अटी शिथील करणे तसेच विविध प्रश्ना संदर्भात अवगत केले. क्रीडा धोरणातील तरतुदींचा स्विकार शासनाने केला असून त्या शिफारशीची अंमलबजावणी शासनाने करावी असे मत क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा महासंघाचे खेळाडू आनंद पवार यांनी तर सुत्रसंचालन वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांनी केले .

याप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दिक्षीत, बालभारती अभ्यासगट सदस्य राजेंद्र पवार, सुवर्णा देवळणकर, लक्ष्मण चलमले, जयदिप सोनखासकर, दत्तात्रय मारकड, सचिन देशमुख, रोहित आदलिंग, घनशाम सानप या तंत्रस्नेहींनी कार्याचा परिचय दिला. शा. शि. महासंघ पुणे सचिव चांगदेव पिंगळे, समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, अमरावती संघटनेचे सहसचिव शिवदत ढवळे, प्रीतम टेकाडे, प्रलोभ कुलकर्णी, डॉ. जितेंद्र लिंबकर यांनी शुभारंभानिमीत्त शुभेच्छा दिल्या. गणेश म्हस्के, बाळासाहेब कोतकर, प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य केले. या ऑनलाईन सोहळ्यास ३२०० शिक्षक महाराष्ट्रभरातून उपस्थित होते.

Previous articleगोंदिया शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू
Next articleकोरोनाच्या पाश्वभूमीवर पूर्वीपासून परंपरागत असलेला वेहेरगाव (वाघापूर) येथील सावळू बाबा आणि मरी माता यात्रा महोत्सव रद्द.