गोंदिया शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू

0
112

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज

गोंदिया,दि.07ः शहरात covid १९ च्या रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे बघून गोंदिया नगरपरिषदेने आमदार विनोद अग्रवाल यांच्या आग्रहावर शहरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय 6 आॅगस्टला झालेल्या सभेत घेतला आहे.नगर परिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचा समूह संसर्गावर ( Community Spread ) आळा घालण्यासाठी ०६ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 8 व 9 आॅगस्टला दोन दिवसाचे जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आले आहे. बैठकीला गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल,नगरपरिषद उपाध्यक्ष शिव शर्मा,मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, नगर परिषदेचे सदस्य,नगर परिषदेतील सर्व पक्षाचे गटनेते व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी वाढती रुग्ण संख्या, शहरातील वाढते प्रतिबंधित क्षेत्र, शहरी भागातील सर्व्हे या बाबतची सविस्तर माहिती सभेत दिली. त्यानंतर सभेमध्ये येणाऱ्या काळात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग ( Community Spread ) रोकण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले . कोरोना विषाणूचा समूह संसर्ग ( Community Spread ) रोकण्यासाठी दिनांक ०८ व ० ९ ऑगस्टला २०२० शनिवार व रविवार या दोन दिवशी संपूर्ण नगर परिषद गोंदिया क्षेत्रात ४८ तासाचा जनता कर्फ्यू करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.जनता कर्फ्यू मध्ये दवाखाने, मेडिकल दुकाने, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाचे व्यवसाय सुरु राहतील. सकाळी ९ वाजेपर्यंतच बाहेरील गावावरून येणारे दुग्ध विक्रेते यांनी दुधाचे वितरण करावे. जनता कर्फ्यू हा कालावधी हा फक्त २ दिवसाचा राहणार असून दि .१० ऑगस्ट २०२० पासून बाजारपेठा नियमानुसार विहित वेळेत सुरु राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

*जनता कर्फ्यू पर्याय नव्हे,बंदचा निर्णय चुकीचा-अखिलेश सेठ, अध्यक्ष रेस्टाँंरेट असोशिएसन*

गोंदिया शहरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यूच्या नावावर व्यवसायिक प्रतिष्ठान बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे,तो चुकीचा असून जनता कर्फ्यू हा काही कोरोनावर मात करण्याचा पर्याय नसल्याचे मत रेस्टाँरेंट असो.अध्यक्ष अखिलेश सेठ यांनी व्यक्त केले आहे.आधीच 3-4 महिन्याच्या लाँकडाऊनमध्ये व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे,अर्धाहून अधिक व्यवयास अजूनही पुर्णत सुरु झालेले नाहीत.त्यातच दोन दिवसाचा बंद मुळे पुन्हा सोमवार ते शुक्रवार दरम्यान जी गर्दी वाढणार आहे त्या गर्दीवर नियंत्रण कोण आणणार आहे.त्याची जबाबदारी जनता कर्फ्यूची मागणी करणारे घेणार आहेत का अशा प्रश्नही त्यांनी उपस्थित करीत जनतेला बंद नको तर त्यांच्यात जनजागृतीसाठी मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत जनता कर्फ्यू अयोग्य असल्याचे म्हटले आहे.ज्या गोष्टींवर उपाययोजना करायला हवे तिथे न करताच भलताच प्रकार लोकप्रतिनिधी व प्रशासन करीत असल्याचेही म्हटले आहे.