मिलिंद विद्यालय गौरखेडा(चांदई)येथे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

233

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित असलेल्या मिलिंद विद्यालय गौरखेडा(चांदई)येथे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला
या विद्यालयाचा दहावीचा निकाल हा 97.29%लागला असून एकूण 37 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयातून 6 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले
*** विद्यालयतुन प्रज्वल नरेंद्र सगणे याने 86.45%गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु साक्षी उमराव वाडे हि विद्यार्थिनी 80%गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली कु वर्षा कैलास इंगळे हिने 79 %गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला
ग्रामिण भागातील या विद्यालयातील विद्यार्थ्यानी मिळविलेले यश हे नेत्रदिपक असून विद्यालयाची व विद्यार्थ्याची हि प्रगती प्रशंसनीय आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, दलितमित्र, समाजभूषण श्री मधुकररावजी अभ्यंकर, सचिव क्षितिज अभ्यंकर, सहसचिव प्राचार्य गजानन वानखडे यांनी कौतुक केले असून विद्यार्थ्यानी यशाचे श्रेय आईवडील, विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्वच शिक्षक यांना दिले आहे