भंडारा जिल्ह्यात आज 10 नवे रुग्ण

0
205

साकोली तालुका प्रतिनिधी–ऋगवेद येवले

 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 352
 बरे झालेले रुग्ण 231
 क्रियाशील रुग्ण 113
 एकूण मृत्यू 02
 संदर्भित रुग्ण 06
भंडारा – जिल्ह्यात आज 10 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 5, लाखनी 2, मोहाडी तालुक्यातील 2 व लाखांदूर तालुक्यातील 1 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 231 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 352 झाली असून 113 क्रियाशील रुग्ण तर 6 संदर्भित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे.

आज 7 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 131 व्यक्ती भरती असून 795 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2077 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 40 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 2037 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.