Home कोरोना  गडचिरोली जिल्हयात 17 सुरक्षा दलातील जवानांसह एकूण 23 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली जिल्हयात 17 सुरक्षा दलातील जवानांसह एकूण 23 नवीन कोरोना बाधित

151

 

कार्यकारी संपादिका रोशनी बैस

गडचिरोली (जिमाक) : वडसा तालुक्यातील सीआरपीएफ बटालीयनमधील 12, अहेरी येथील मात्र सद्या गुरगाव युपी येथे उपचारात असलेले 2 व धानोरा पोलीस स्टेशन येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील 3 पोलीस जवान अशा 17 सुरक्षा दलातील जवानांचे कोरोना अहवाल सकारात्मक मिळाले. तसेच सिरोंचा तालुक्यातील 5 जण व भामरागड येथील एक व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला आहे. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 183 झाली. तर एकुण बाधित संख्या 694 झाली. आत्तापर्यंत एकूण 510 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा जिल्हयाबाहेर मृत्यू झाला आहे.

नवीन बाधितांमध्ये वडसा येथील सीआरपीएफ बटालियनचे 12 सदस्य कामानिमित्त पुणे येथे शासकिय वाहनाने गेले होते. आल्यानंतर सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सर्वांचे तपासणीनंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले. तसेच अहेरी येथील सीआरपीएफ बटालियनचे दोघे गुरगाव येथे गेल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा रहिवासी पत्ता अहेरी येथील असल्यामूळे त्यांची कोरोना नोंद जिल्हयात करण्यात आली आहे. त्या दोघांवर गुरगाव येथे उपचार सुरू आहेत. त्यानंतर धानोरा येथे प्रतिबंधात्मक क्षेत्र लावण्यात आले होते. तेथील पोलीस आणि इतरांच्या तपासण्या करणे सुरू आहे. त्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळून आले. अशा प्रकारे जिल्हयातील 17 सुरक्षा जवान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. तसेच जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील दोन व्यक्ती वाहन दुरूस्तीसाठी तेलंगणामध्ये प्रवास करून आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील इतर तिघेही बाधित असल्याचे आढळून आले आहे. तसेच भामरागड येथील एक व्यावसायिकाचा कोरोना बाधित आढळून आला आहे.

Previous articleआरमोरी महीला शहर काॅग्रेसच्या अध्यक्षपदी निर्मलाबाई किरमे यांची नियुक्ती
Next articleकृषी पंपाला बारा तास वीज देण्याचे नियोजन करा : पालकमंत्री सुनील केदार