आरमोरी महीला शहर काॅग्रेसच्या अध्यक्षपदी निर्मलाबाई किरमे यांची नियुक्ती

0
127

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 7 ऑगस्ट
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस च्या महाराष्ट्र महिला कांग्रेसचे प्रेदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने कांग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष सौ.भावना वानखेडे व माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी निर्मला अनिल किरमे यांना कांग्रेसच्या आरमोरी शहर अध्यक्ष पदाची नियुक्ती करून नियुक्त पत्र दिले.
कांग्रेस पक्ष बळकटी करिता प्रयत्न करून कांग्रेस बळकटी करिता जास्तीत जास्त महिला जोडण्याचे प्रयत्नात राहणार असे निर्मला किरमे यांनी म्हटले आहे .
नियुक्ती पत्र देते वेळेस माजी आमदार आनंदराव गेडाम हजर होते तसेच नगरसेविका दुर्गा लोणारे,कीर्ती पत्रे नगरसेविका, मिलिंद खोब्रागडे नगरसेवक, सौरभ जक्कलवार युवा तालुका अध्यक्ष,बेबी सोरते,अनिल किरमे,मडावी आ. महिला तालुका अध्यक्ष, अशोक किरंगे शाखा प्रमुख इत्यादि उपस्थित होते.
नियुक्तीचे श्रेय मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री,मा नामदेव उसेंडी जिल्हाध्यक्ष,रवींद्र दरेकर महाराष्ट्र कांग्रेस सचिव,रोशनी बैस जिल्हा महासचिव, किशोर वनमाळी तालुका अध्यक्ष आरमोरी, सुदाम मोटवणी गटनेता नगर परिषद आरमोरी, तेजस मडावी जिल्हा उपाध्यक्ष ,श्रीकांत वैद्य युवा शहर अध्यक्ष,शालीक पत्रे शहर अध्यक्ष, विजय सुपारे,राजू गारोदे कांग्रेस सेवादल अध्यक्ष व कांग्रेस कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.