साकोलीत अन्ना भाऊ साठे जयंती साजरी

109

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
(7 ऑगस्ट)
साकोली-लोकशाहीर कवी सम्राट अण्णा भाऊ साठे यांना दिनांक 1/8/2020 ला संपूर्ण महाराष्ट्रात 100 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आला ! महाराष्ट्र राज्य आणि देशात कोरोणा विषाणू चा प्रकोप सुरू असल्याने नेहमीप्रमाणे कवी संमेलन, साहित्य संमेलन, साहित्य दिंडी व इतर प्रकारचे कार्यक्रम करण्याकरिता अडचण येत असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे , चे महासंचालक माननीय कैलास कणसे साहेब आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत झूम अॅप च्या माध्येमातून संपूर्ण महाराष्ट्रात संशोधन संस्थांच्या तालुका व जिल्हास्तरावर कार्य करणाऱ्या समता दुतांच्या सक्रियतेने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जयंतीच्या कार्यक्रम 1/8/2020 आढवडाभर घेण्यात येत असून, दिनांक-6/8/2020 ला साकोली जिल्हा भंडारा इथे साकोलीचे समता दुत उद्धव निखारे यांच्या सह,जिल्हा प्रमुख गोडबोले साहेब आणि जिल्ह्यातील सर्व समता दूतांच्या सहभागाने कैलास गेडाम साकोली जिल्हा भंडारा यांनाही जोडण्यात आले. यावेळी कैलास गेडाम यांनी अंनभाउच्या जीवन कार्यावर आधारित विविध भाष्य करून,…तू गुलाम नाहिश..तू स्वतंत्र जगाचा निर्माता आहेेश..,मला लढा मान्य आहे…रडगाणे नाही…! अशी ताकत देणारे वीर संबोधून अभिवादन केले! डॉ बाबासाहेबआंबेडकरांच्या समतेच्या विचाराची ज्योत आयुष्य भर तेवत ठेवली…,जगा बद्दल घालुनी घाव….मज सांगुनी गेले भीमराव….! असा उत्साह लोकांमधे निर्माण केला म्हणून मी माझ्या जीवनभर ऋणी राहीन अशी भूमिका स्वीकारून, डॉ बाबासाहेब आंबेडकर,ज्योतिबा फुले,शाहू महाराज,संत तुकाराम,संत गाडगेबाबा, संत कबीर, शिवाजी महाराज,तथागत गौतम बुद्ध या सर्वांच्या थोर विचार सरणीस अर्पण राहून जीवनभर कार्य करणाऱ्या अण्णाभाऊंच्या क्रांतीच्या दिशेने आजच्या तरुण पिढीने कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.