फुलचंद भगत
मंगरुळपीर-मानोरा तालुक्यातील मौजे आसोला,जवळा बु,कोलार,गिरोली परिसरातील संत्रा बागांची संशोधक यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी कृषि विदन्यान केंद्र करड़ा ता रिसोड येथील संशोधक श्री डी एन इंगोले यांनी पाहणी करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा पिकाचे मृग बहार व्यवस्थापन व विक्री या बाबत चर्चात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.
चालू वर्षी फारच कमी संत्रा बागामधे मृग बहार फुटला असल्याने संत्रा पिकाला बाजारात चांगली मागणी असणार आहे,व संत्रा व्यापारी आता पासुनच चढया भावाने संत्रा खरेदी करत आहेत,परन्तु शेतकऱ्यांना बाजाराची स्थिति माहिती नसल्याने शेतकरयांची फसवणूक होवू नये यासाठी या भेटिचा शेतकऱ्यांना खुप फायदा होणार आहे.तसेच उत्कृष्ट संत्रा वफळे उत्पादन कसे करावे याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या प्रक्षेत्रभेटिचे वेळी मंडळ कृषि अधिकारी श्री गणेश जैताड़े व विनोद घोडेकर,तालुका कृषि अधिकारी श्री सचिन काम्बले,कृषि पर्यवेक्षक श्री देवेंद्र देशमुख, श्री सुरेश मनवर तसेच कृषि सहायक श्री जगदीश धामनिकर,बाबाराव राठोड, धुळप्पा मासाळ उपस्थित होते.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206