अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे
अकोट तालुक्यातील देवरी येथील शेतकरी हरिभाऊ वाघोडे यांनी टाकाऊ वस्तु पासून खत पेरणी यंत्र बनवले आहे .लॉकडाउन काळात टाकाऊ प्लास्टिक कॅन पासून खत पेरणी यंत्र करण्याची कल्पना शेतकऱ्याला सुचली त्यांनी घरीच वखराला लावण्यासाठी 15 लिटर तेलाच्या टाकाऊ कॅनीला खतपेटी म्हणून उपयोगात आणले त्याला दोन छिद्र करून वखराला लावले अत्यंत कमी खर्चात हे जुगाड यंत्र तयार झाले.
या जुगाड खत पेरणी यंत्रामुळे प्लास्टिक कॅन मधील खत जलदगतीने 4 ते 6 इंचापर्यंत कपाशीच्या मुळाशी पोहोचते त्यामुळे पिकांची वाढ होण्यासाठी या यंत्राचा उपयोग होत असून
मजुरांची ही बचत झाली. शिवाय कामाला गती आली असून एकावेळी 10 एकर शेतात एका मजुराच्या साह्याने बैल जोडी द्वारे योग्य पद्धतीने खत टाकणे शक्य होत आहे त्यामुळे या प्रयोगाची पाहण्यासाठी अकोट तालुक्यातील शेतकरी शेताला भेट देत आहेत.