ओबीसी आरक्षणाची पायमल्ली केंद्र सरकार ने थांबवावी…. वंचित बहुजन आघाडी ची मागणी..

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
वंचित बहुजन आघाड़ी चिमूर तालुकाध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी साहेब चिमूर मार्फत मा राष्ट्रपती साहेबांना निवेदन देण्यात आले.
देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल कमीशन नुसार दिलेले २७ टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरु आहे केंद्रातील मोदी सरकार ने ओबीसी च्या हक्काचे आरक्षण मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये पुर्ण पने डावलले आहे असे उघडकीस आले आहे‌.
आँल इंडिया फेडरेशन आँफ अदर बँकवर्ड क्लासेस कर्मचारी संघटनेने ( एआयओबीसी )* द्वारे आरोग्य मंत्रालया कडे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की २०१७ पासुन दहा हजारा पेक्षा अधिक ओबीसी उमेदवारांना मेडीकल च्या पदवीधर ,व पदव्युत्तर अभ्यास क्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारण्यात आले यामुळे या जागा उच्च वर्णिय खुल्या गटातील विद्यार्थ्याकडे गेलेल्या आहेत.
केंद्रीय पातळीवरून अखिल भारतीय वैद्यकिय काँऊन्सिल द्वारा देशातील सर्व महाविद्यालया मध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया होत असतांना केंद्र सरकार ने वैद्यकीय संस्थामध्ये ओबीसी आरक्षण न लागु केल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासुन वंचित राहावे लागत आहे
ओबीसी विद्यार्थी करीता असलेली शिष्यवृत्ती ५०० कोटीवरून ३४ कोटी रुपयावर आली. स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण डावलण्यात येत आहे .
१९३१ ला ब्रिटीश सरकार ने जातीनिहाय जनगनना केली परंतु स्वातंत्र्यानतंर मागास जातीची नेमकी टक्केवारी कीती या माहीती करीता जातीनिहाय जनगननेची गरज असतांना दर दहा वर्षानी होणारी जनगणना मध्ये जाती चे दोन या तीन रखाने ठेवण्यास का घाबरत आहे ? केंद्र सरकार देशातील ५२ टक्के समुहाला देशातील नागरीक समजत नाही काय हा प्रश्नच निर्मान झालेला आहे ? त्यांचे आरक्षण सरकार व न्यायालये वेगवगळ्या मांध्यमातुन काढु पाहत असुन संविधाना ने बहाल केलेल्या शिक्षण , नौकरी ,व राजकीय वंचित ठेवले जात आहे त्यामुळे केंद्र्र सरकारने ओबीसी विरूद्ध कटकारस्थाने बंद करावी व घटनेनुसार बहाल केलेले आरक्षण देण्यात यावे .तसेच देशात जातीनिहाय जनगनना करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल करीता वंचित बहुजन आघाड़ी तालुका चिमूर तर्फे मा.उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत महामहिम राष्ट्रपति साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे , ऍड. शनैशचंद्र श्रीरामे साहेब,प्रा.नागदेवते सर,मा.शालीकराव थुल,शैलेश गायकवाड, प्रवीण गजभिये, श्रीदास राऊत,मनोज राऊत,रामदासजी राऊत,जयदेव डांगे,आकाश भगत,वासुदेव गायकवाड, बंडू ढोक,विकास अंबादे,हरिदास सोरदे,जनार्धन खोब्रागडे आदि उपस्थित होते.