कौशल्यआधारित शेतमजूर प्रशिक्षण संपन्न

115

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर- दिनांक 7 ऑगस्ट रोजी मानोरा तालुक्यातील मौज-तोरणाळा या गावी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे वतीने शेतकरी व शेतमजूर यांचेसाठी प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी,श्री सचिन कांबळे मंडळ कृषि अधिकारी श्री विनोद घोडेकर व श्री गणेश जैताड़े हे उपस्थित होते.
या वेळी किडनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
फवारणी करनाऱ्या व्यक्तिने पोटभर जेवन करून, फवारणी किट वापरूनच फवारणी करावी,फवारणी करणाऱ्या व्यक्तिने फवारणी करतांना मद्यपान किंवा धूम्रपान करू नये!
फवारणी करतांना शक्यतो हवेच्या दिशेने फवारणी करावी.फवारणी करतांना फवरणीचे पम्प किंवा त्याचे नोजल फूटके किंवा गळके नसावे.
माहिती विना एकपेक्षा अधिक किडनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये.
किडनाशके व तननाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये.
तननाशकासाठी वापरलेले पंप स्वच्छ धुवूनच किडनाशके फवारणीसाठी वापरावे.
फवारणी करतांना विषबाधा झाल्यास त्वरित जवळच्या उपचार केंद्रात बाधित व्यक्तिस दाखल करून उपचार घ्यावेत.
या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी सर्व उपस्थित शेतकरी व शेतमजूर यांची शिवारफेरी घेण्यात आली.
कापूस,सोयबीन व उडीद पिकावरिल मित्र किड, शत्रु किड यांची ओळख शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर करून देण्यात आली.
किडींच्या आर्थिक नुकसानीची पातळी कशी ठरवावी व त्यावर उपाय योजना कशी करावी याबाबत सविस्तर प्रक्षेत्रभेट व मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंका समाधान व प्रश्नोत्तरे याचेही एक सत्र घेण्यात आले.
अत्यंत साधक बाधक चर्चा होवून हे प्रशिक्षण सम्पन्न झाले.
गावातील 80 शेतक-यानी या प्रशिक्षणाचा सोशल डिस्टसिंग चे नियम पाळून लाभ घेतला.
या प्रसंगी सध्या सोयबीन पीके जोमदार असल्याने फुलाच्या अवस्थेत असल्याने तंबाखू वरील पाने खाना-या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतक-यानी एकरी 5 फेरोमोन ट्रैप लावन्याचा सल्ला तालुका कृषि अधिकारी श्री कांबले यांनी दिला
या कार्यक्रमाचे आभार श्री एम डी सोलंके कृषि सहायक यांनी मानले।
कार्यक्रमास सर्व कृषि कर्मचारी हजर होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273207