पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्राच्या आजुबाजूला काटेरी कुंपण असल्यामुळे रुग्णांना उपचार व लस घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

183

निरा नरसिंहपुर दिनांक, 3 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सर्व परिसर नीरा नरसिंहपूर, गिरवी, टणु, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, गणेशवाडी, लुमेवाडी, या सर्वच गावांसाठी पिंपरी बुद्रुक आरोग्य उप केंद्र असून या भागातील रुग्ण व नागरिकांना पिंपरी बुद्रुक मध्ये उपचार व लस घेण्यासाठी नेहमीच वेळोवेळी जावे लागत  आहे. उपकेंद्राच्या आजुबाजूला काटेरी झाडे असल्यामुळे  त्या पासून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. पाणी पिण्याची सोय नाही, आजूबाजूस  लाईटची व्यवस्था नाही, रुग्णालयाला कंपाउंडच्या संरक्षण भिंतीची सोय नाही हजारो नागरिकांचे जीवन पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रावर अवलंबून असल्याने अनेक सुविधा पसून हे केंद्र वंचित आहे. एकीकडे कोरोणा रोगाचे महाभयंकर संकट असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. बावडा व इंदापूर येथील आरोग्य अधिकारी पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्राकडे लक्ष देतील का असा सवाल या भागात ग्रामस्थ करीत आहे. आरोग्य केंद्राच्या  बाजूला दाठ जंगला प्रमाणे काटेरी झाडे असल्यामुळे मुख्ये प्राणी, जनावरे, साप, यासारख्या प्राण्यांचा सुळसुळाट असल्याने पिंपरी बुद्रुक आरोग्य केंद्रामध्ये राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याला यापासून स्वतःचा जीव धोक्यात ठेवून कामाची हजेरी लावून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीकांत बोडके हे राज्यमंत्री दत्ता त्रय  भरणे यांची मदत घेऊन आरोग्य केंद्राला आलेल्या अडचणी सोडवतील का याकडे  सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

——————————————-

फोटो व ओळी:– पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य केंद्राच्या  बाजूस असलेल्या काटेरी झुडपामुळे रुग्णांना लस घेण्यासाठी करावी लागत असलेली कसरत.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160