श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव (आरमोरी) पालोरा व काळागोटा येथे उत्साहात साजरा.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

श्रीराम मंदिर जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव आरमोरी नगर परिषद प्रभाग क्रमांक २ पालोरा येथे साजरा करण्यात आला.
पालोरा येथील सार्वजनिक हनुमान मंदीरात जेष्ठ नागरिक मा. धर्मराव पाटील धोटे यांच्या हस्ते आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भा. ज. यु. मो. जिल्हा सचिव सुनील नंदनवार, नगर सेवक मिथून मडावी, पोलिस पाटील गजानन धोटे, दादाजी सहारे, देवराव हारगुळे, नरेश ढोरे, सुनील प्रधान, देवेंद्र धोटे, दिनेश खरकाटे, अमोल धोटे, रमेश कुथे, सुरेश हारगुळे, किशोर कुथे, आणि पालोरा येथील नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीराम स्त्रोत्र पठण करून , जय श्रीराम च्या घोषणा देऊन उपस्थीतांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
तसेच आरमोरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १ काळागोटा येथील हनुमान मंदीरात आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव सुनील नंदनवार, प्रमोद पेंदाम, दुर्योधन भांडेकर, राजू वाघधरे, आकाश जुआरे, उमेश वाघधरे, करण वाघधरे आणि काळागोटा वासीय उपस्थित होते.
यावेळी जय श्रीराम च्या घोषणा देऊन उपस्थीतांना प्रसाद वाटप करण्यात आले.