टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन खाजगी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा भीक मांगो आंदोलन करणार

176

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

कोरची:-दि 7 ऑगस्ट
मागील चार महिन्यापासून खाजगी काळीपिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहने covid-19 या पार्श्वभूमीवर बंद आहेत देशभरात व जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तरी उद्योग-व्यवसाय बुडू नये यासाठी सरकार धोरण निश्‍चित करीत आहे.
शासनाने एसटी महामंडळाच्या बसला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे मात्र
खाजगी प्रवासी वाहनांना परवानगी नाकारली आहे.
चार महिन्यापासून वाहने बंद असल्याने टॅक्सी चालक-मालक बेरोजगार झाले आहेत व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांची वाहने कर्जावर खरेदी केलेली असल्याने कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. करिता टॅक्सी चालक-मालक संघटनेने कुटूंबाचे उदरनिर्वाहाकरिता दिनांक 10/08/2020 पासून कोरची येथे भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
टॅक्सी व इतर खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. चालक-मालक संघटनेला आर्थिक मदत देण्यात यावी. याकरिता हे निवेदन सादर करण्यात आल्याचे समजते.