कांन्द्री येथुन हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी वाहन चोरी कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल

34

 

पारशिवनी: – पाराशिवनी तालुका तिल कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत साईकृपा जनरल स्टोअर्स कांन्द्री येथुन रमेश मानकर ,रा.हिगणा यांची हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी वाहन चोरी गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक २८ आगस्ट २०२१ ला रात्री ०९:३० वाजता च्या दरम्यान रामटेक वरुन हिंगणा कडे जात असतांना रमेश पांडुरंग मानकर वय ५८ वर्ष राहणार वार्ड नंबर एक बाजार चौक हिंगणा यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटार सायकल क्रमांक एम एच ४० जी ७५२९ किंमत १८,००० रुपए ही खराब झाल्याने वाहन मालक रमेश मानकर यांनी आपली हिरो होंडा पॅशन प्लस मोटार सायकल क्रमांक एम एच ४०जी ७५२९ही साईकृपा जनरल स्टोअर्स ,पेट्रोल पंप जवळ कांन्द्री च्या समोर दिनांक २८अगस्त ला रात्रि ९वाजता रोडवर उभी करुन ठेवली व आपले घरी निघुन गेले . दुस्या दिवसी
तक्रारदार रमेश मानकर,रा.हिगणा यांनी रविवार दिनांक २९ आॅगस्ट २०२१ ला सकाळी १०:०० वाजता येवुन पाहिले असता त्यांची गाडी मिळुन न आल्याने रमेश मानकर यांनी जवळ पास विचारपुस केली व पाहाणी केली असता मिळून न आल्याने बुधवार दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रि कन्हान पोलीस स्टेशन येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ३२३/२०२१ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .