अयोध्या श्रीराम मंदीर भुमिपुजन सोहळा चा कन्हान परिसरात उत्सव

117

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – अयोध्येत श्रीराम मंदिराचे भुमिपुजन सोहळा संपन्न होत असल्याने कन्हान, कांद्री, टेकाडी परिसरात हनुमान मंदिर व श्री राम मंदिरात सजावट, भजन , पुजन व घरावर भगवा ध्वज आणि भगवी पताका लावुन उत्सव साजरा करण्यात आला.
बुधवार (दि.५) ला अयोध्येत मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते श्रीराम मंदीराचे भुमिपुजन करण्या त आल्याने कन्हान, कांद्री महामार्गाने व घरावरती भगवा ध्वज, भगवी पताका ला वुन हनुमान मंदीर गांधी चौक, जय शित ला माता मंदीर, हनुमान मंदीर देवस्थान कांद्री, श्री संताजी सत्कार समिती कांद्री व्दारे श्री हनुमान मंदीर कांद्री येथे श्रीराम प्रतिमेचे पुजन शिवाजी चकोले,वामनजी देशमुख, झिबल सरोदे, प्रेमदास आकरे, महेंद्र पलिये वासुदेव आकरे, सेवकराम भोंडे च्या हस्ते करण्यात आले. सौ लता सावनेरे, मालती वांढरे, किरण यादव, सुशिला विश्वकर्मा,ज्योती हिवरकर आदी ने सुंदर पाठ गायन केले. नवदुर्गा महिला भजन मंडळाच्या सुनिता हिवरकर, उषा वंजारी, शोभा फुकटकर, बेबी साखरे, सरीता केवट, शोभा गायकवाड यांनी तसेच वारकरी भजन मंडळाचे विक्रम वांढरे, मधुकर कांबडे, अशोक किरपान, राजहंस वंजारी, मधुकर खडसे आदीने भजनाचा कार्यक्रम केला. तदंतर पुजा पाठ, आरती करून प्रसाद वितरण करण्यात आला.
श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी व्दारे दुपारी १२ वा.अयोध्या राम मंदिर भुमिपूजनाच्या पार्श्वभुमि वर राम सरोवर टेकाडी येथे श्रीराम पादुकांचे पुजन,भजन करित श्रीरामाचे स्मरण कर ण्यात आले. सायंकाळी हनुमान मंदीर टेकाडी ला दिपोत्सवासह भजन करून प्रसाद वितरण करण्यात आले. हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे सह गावकरी मंडळीने उत्सव साजरा केला.