कोरची – भीमपुर रस्त्याचे खड्डे त्वरीत बुझवा, अन्यथा आंदोलन करू – भ्रष्टाचार विरोधी समिति कोरची

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची – दि 7 ऑगस्ट
दरवर्षी कोरची – भीमपुर रस्यावर मोठ मोठे जीवघेणे खड्डे निर्माण होत असुन यावर प्रशासनाचे लाखो रुपये वाया घालवुन फक्त तात्त्पूर्ति डागडुजी केले जाते आणि काही महिन्यातच परिस्थिति जैसे थे. दुर्दैवाची बाब म्हणजे डागडुजी करण्यात आलेल्या कोरची भीमपुर रस्त्याचे हाल एका पावसाड्यापर्यंत सुद्धा व्यवस्थित राहत नाही. याच रस्त्यावर कित्येक अपघात सुद्धा झाले आहेत. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे निर्माण होत असून पावसाळ्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज सुद्धा जाणवत नाही यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहेत. याच खड्ड्यामुळे चार चाकी व जड वाहनांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत असून त्यांचे सुद्धा कित्येकदा नुकसान होत असल्याचे बघितले जात आहे.
नुकताच कोरची – भीमपुर रस्त्यावर पाचशे मीटरचा सिमेंट रस्ता एका बाजूला बांधण्यात आला असून दुसर्‍या बाजूचे काम अजून सुरू करण्यात आले नाही व नवीन बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या सुरुवातीला व अखेरला स्लोप न दिल्यामुळे नवीन रस्त्यावर सुद्द्धा गाडी चालवणे कठीण होत आहे. सदर रस्ता हा राज्यमार्ग असून छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेला हा रस्ता 14 आगस्ट पर्यंत व्यवस्थितपणे दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा 15 आगस्ट ला स्वातंत्र दिनाच्या दिवशी अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिति कोरचीच्या वतीने त्या खड्यांवर बेशरम ची झाडे लाउन आंदोलन करण्यात येईल असा इशारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिति कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, श्याम यादव, सिद्धू राउत, जितेंद्र सहारे, चेतन कराडे, धम्मदीप लाडे, अभिजित निंबेकर, भूमेश शेन्डे, बंटी जनबंधु, निखिल साखरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना कोरची येथील तहसिलदार भंडारी यांच्या माध्यमातुन दिला आहे.