पवईतील गौतम नगर व इंदिरा नगर लगत असलेल्या डोंगराळ जागी सुरक्षा भिंत किंवा जाळी उभारण्यात यावी -राहुल गच्चे अतिवृष्टी मुले होणारी जीवित हानी टाळावी स्थानिक प्रशासन यांनी दखल घ्यावी

172

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

मुंबई : पवईतील बरीच ठिकाण अशी आहेत की डोंगरालगत काही कुटुंब आपले बस्तान छोट्याश्या खोलीत राहतात. पावसाळ्यात या कुटुंबील प्रत्येक व्यक्तीच्या मनाता धाकधूक लागलेली असते कारण येणाऱ्या मुसळधार पावसाने डोंगरलगत असलेल्या संरक्षण भिंत कालांतराने कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यातच हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे दिनांक ४ व ५ ऑगस्ट २०२० रोजी मुंबई मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पवई गौतम नगर व इंदिरा नगर येथील डोंगरालगत असलेल्या घराजवळ दरड कोसळली.
सुदैवाने दैव बलवंत म्हणून कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. परंतु येणाऱ्या काही वर्षात पावसाळ्यात अशाप्रकारे दरड कोसळून कोणत्याही प्रकारची जीवित हाणी होऊ नये व कोणालाही यात आपले प्राण गमवावू लागू नये त्या करीत लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून तेथे जिव मुठीत घेऊन राहणाऱ्या कुटुंबांना सुटकेचा श्वास घेऊ द्यावा.
तसेच स्थानिक आमदार सुनील राऊत तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका पालिका प्रशासन यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले आहे तरी
या ठिकाणी स्थानिक आमदार यांनी म्हाडा अंतर्गत आपत्कालीन निधीतून या ठिकाणी तत्कालीन त्वरित दखल घेऊन काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे विक्रोळी तालुका युवा कार्यध्यक्ष
राहुल गच्चे यांनी केली आहे

दखल न्यूज भारत