सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्यात येऊ नये यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल.

124

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) प्रणित आणि इतर विरुद्ध आणि युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन प्रकरणी कोविड -१९ या साथीच्या रोगाची परिस्थिती लक्षात अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्यात येऊं नये याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयात आज हस्तक्षेप याचिका दाखल केला आहे.आम्ही हस्तक्षेप याचिकेद्वारे सध्याची वस्तुस्थिती,आकडेवारी व संशोधन याची मांडणी केली आहे, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही केलेल्या सर्वेक्षण सुद्धा सादर केलेले आहेत तसेच या विषयावरील सर्व माहिती त्याद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेले पत्रव्यवहार सुद्धा याचिकेद्वारे सादर केले आहेत.
आम्ही हस्तक्षेपाच्या अर्जात प्रार्थना केली आहे की कोविड १९ ची सद्य परिस्थितीत आणि पुढील अनिश्चितता यामुळे विद्यापीठ परीक्षा घ्यायची की नाही हा निर्णय संबंधित राज्यांकडेच ठेवला जावा आता या प्रकरणी १० ऑगस्ट २०२० रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी केली जाईल.संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या सुनावणीवर असणार आहे.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठविलेला आहे. दिनांक १७ मार्च २०२० रोजी मान. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन कार्यवाहक सरन्यायाधीशांना पत्र लिहून हस्तक्षेप याचिका केली होती व त्याआधारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने उपाययोजना कराव्यात या सूचना लक्षात घेऊन राज्याने सर्व परीक्षा पुढे ढकलेल्या होत्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे शैक्षणिक भवितव्य लांबणीवर जाऊ नये व त्यांना उचित न्याय मिळावा याकरिता स्वतः मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी हस्तक्षेप करावे यासाठी आम्ही १५ जुन २०२० रोजी आणखी एक पत्र लिहिले आणि तसेच पुढे जाऊन पुण्यातील एका व्यक्तीने कोविड परिस्थितीत परीक्षा घेण्यात याव्यात अशी याचिका दाखल केली होती परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा घेणे उचित नाही म्हणून आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज तसेच परीक्षा घेण्याविरूद्ध आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे त्यावर पुढील सुनावणी १८ ऑगस्ट २०२० रोजी ठेवण्यात आली आहे .

*दखल न्यूज भारत*