शिवसेना शाखा क्रं. १२९ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

131

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध लोकउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तसेच संपूर्ण मुंबई शहरातील रूग्णालयात मोठ्या प्रमाणात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन विभागप्रमुख राजेंद्र भिवा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार प्र.क्रं.१२९ चे लोकप्रिय,कार्यसम्राट ,शाखाप्रमुखशिवाजी काशिनाथ कदम
यांच्या प्रयत्नाने शिवसेना शाखा क्रं. १२९ च्या वतीने समर्पण रक्तपेढी (सर्वोदय रुग्णालय यांच्या माध्यमातून रविवार ,दि.२ ऑगस्ट २०२० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास घाटकोपर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (पी आय )सन्माननीय चंद्रकांत लांडगे ,विधानसभा संघटिका कार्यसम्राट नगरसेविका अश्विनी ताई मते, कार्यसम्राट नगरसेवक शिवभक्त संजय दादा भालेराव ,विश्वशांती मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित भाटकर यांनी सदिच्छा भेट दिली.रक्तदान शिबिरास आपल्या विभागातून एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यापैकी ६२ रक्तदाते पात्र ठरले.
रक्तदान शिबिरात मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे खूप खूप आभार.
शाखाप्रमुख शिवाजी काशीनाथ कदम, कार्यालय प्रमुख लवू रामचंद्र पार्सेकर, युवासेना शाखाअधिकारी सतिश शंकर कोकाटे, भा वि से शाखासंघटक रोहित पाटील , ग्राहक संरक्षण कक्ष, शाखा संपर्कप्रमुख, विश्वनाथ जाधव, युवती शाखाधिकारी दिव्या जाधव,
व सर्व उपशाखाप्रमुख ,महीला आघाडी,युवासेना, भा. वि. से, युवती सेना ,ग्राहक संरक्षण कक्ष,गटप्रमुख ,शिवसैनिक ,सर्व शिवसेना प्रेमी.