मुंबई महापालिका शारीरिक शिक्षण विभागाचे काम वाखाणण्याजोगे आहे. – शिक्षणाधिकारी राजू तडवी

226

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. २९ : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व मुंबई शहर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या उपस्थितीत हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पाहुणे म्हणून मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी, क्रीडा व युवा संचालनालयाचे उपसंचालक संजय महाडिक, मुंबई शहर जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फडतरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व फुटबॉलचे प्रशिक्षक गॉडफ्रे परेरा, उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, मनपा वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्रशासकीय अधिकारी (शाळा), शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी, विभाग निरीक्षक व सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक उपस्थित होते.
कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर व अनंत आगरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी करुन दिला. शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव यांनी सर्व उपस्थितांच्या मदतीने प्रतिज्ञा घेतली. शारीरिक शिक्षण विभागाची घोडदौड कशी सुरु आहे याबाबत प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी सविस्तर माहिती दिली.
मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शारीरिक शिक्षण विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक संजय महाडिक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मुंबई शहर जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फडतरे यांनी मुंबई महापालिकेच्या शारीरिक शिक्षण विभागाचे काम सुंदर असते असे सांगितले. फुटबॉल प्रशिक्षक गॉडफ्रे परेरा यांनी उपस्थित शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर यांनी सुत्रसंचालन केले तर शेवटी सर्वांचे आभार कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी यांनी मानले. शारीरिक शिक्षण शिक्षक तुळशिराम बोराडे यांनी बासरीवर राष्ट्रगीत वाजवुन कार्यक्रमाची सांगता केली.