Home नीरा नरसिंहपूर शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण इंदापूर ब्रँड महाराष्ट्रात विकसित झाला आहे – माजी सहकार मंत्री...

शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण इंदापूर ब्रँड महाराष्ट्रात विकसित झाला आहे – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.

212

 

निरा नरसिंहपुर दिनांक 6 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार

केंद्र सरकारने नुकतेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले असून या धर्तीवर सर्वसमावेशक आदर्शवत ठरणारे ज्ञानवर्धित, आधुनिक भारत घडवणारे आणि व्यवसाय अनुकूल तसेच लवचिक धोरणाचा अवलंब असणाऱ्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आराखड्याचा दृष्टीकोण समोर ठेवून महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र ठरेल असा इंदापूर ब्रँड तयार झाला असून अधिक गुणात्मक होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आणि श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलताना वरील मत व्यक्त केले.

इंदापूर महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये संस्थेच्या शाखेतील दहावी व बारावीमध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा आणि शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. श्री नारायणदास रामदास इंग्रजी मिडीयम, एस. बी. पाटील वनगळी, कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली, शहाजीराव पाटील विद्यालय रेडा, शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के निकाल लागला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ पुढील पन्नास वर्षांचे व्हिजन समोर ठेवून गुणात्मक शिक्षण, उत्तम नागरिक घडविणारे शिक्षण, संशोधनाधिष्ठित शिक्षण, संस्कृती जोपासणारी शिक्षण तसेच काळानुरूप बदलत्या परिस्थितीमध्ये देखील करिअर निर्माण करणारे शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणाऱ्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत आपल्या शैक्षणिक संस्थेचा ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. अशा शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडणार आहे तसेच युवाशक्तीच्या माध्यमातून राष्ट्र देखील घडणार आहे. मुलींनी चांगले यश संपादन केले आहे. समय सूचकता, सामान्य ज्ञान, डिजिटल शिक्षणाचा अवलंब करीत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शिक्षण हे परिपूर्ण नागरिक, उत्तम संस्कार घडवणारे असले पाहिजे. आपल्या मातीचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेतील बदल स्वीकारले पाहिजे. गुणात्मक शिक्षणाने आपला ब्रँड तयार झाला पाहिजे.

जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील म्हणाल्या की,’ व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सामाजिक मिडिया आणि तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चांगले यश संपादन केले आहे याचा अभिमान वाटतो. हा दिवस या अर्थाने यशस्वी कामगिरी केल्याने ऐतिहासिक ठरतो. दहावी आणि बारावी हे आयुष्यातील टर्निंग पॉईंट मानले जातात असेच धाडस करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या पुढे अनेक शिक्षणासाठी पर्याय उपलब्ध असून आवडीच्या क्षेत्रात तसेच शैक्षणिक कल चाचणीच्या माध्यमातून आपण करियर करण्यास प्राधान्य द्यावे.’

परीक्षेमध्ये यशस्वी यश संपादन केलेल्या अंजली जाधव, अनुजा थोरात, प्राची डोंगरे, आकांशा फडतरे, विशाल निकम, धनश्री जाधव, प्रणाली कांबळे या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना  दहावी व बारावीनंतर शैक्षणिक प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केले. मुलांची मानसिकता, मनाचा कल लक्षात घेतला पाहिजे. नवीन बदलाला सामोरे जाताना विरोध हा होतोच. ऑनलाईन शिक्षण प्रणाली आत्मसात केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बावडा संस्थेचे सचिव किरण पाटील, इंदापूर संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, गणपत भोंग, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विकास फलफले, चंद्रकांत कोकाटे, गणेश घोरपडे, उपमुख्याध्यापक केशव बनसोडे तसेच रामहरी लोखंडे यांनी प्रयत्न केले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Previous articleशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वरवडे गावातील वेद जोशीने संस्कृत विषयात मिळविले १०० पैकी १०० गुण
Next articleकैलास वासी भगवान नामदेव पडळकर यांचे वृद्धप काळाने निधन झाले. निधना समयी यांचे वय वर्ष 95 होते. : पिंपरी बुद्रुक गावचा आधारस्तंभ हरपला संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला