शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वरवडे गावातील वेद जोशीने संस्कृत विषयात मिळविले १०० पैकी १०० गुण

145

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : माध्यमिक शालान्त प्रमाणपञ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.काही विद्यार्थ्यांनी आपले आई वडील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय यश मिळविले आहे.माञ वरवडे ( ता .रत्नागिरी ) गावातील माध्यमिक विद्यामंंदीरचा सामान्य घरातील विद्यार्थी कु वेद अश्विनीकुमार जोशी याने सरस्वतीची खऱ्या अर्थाने आराधना करुन ९४ टक्के गुण मिळविले आहेत. एवढेच नव्हे तर संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.वेद याचे वडील अश्विनीकुमार जोशी हे पौरोहित्य करतात तर आई अर्पिता गृहिणी आहे.आजोबा अरविंद गोविंद जोशी हे शेतकरी असून ,उत्तम तबला आणि हर्मोनिअम वादक आहेत.या वयातही ते इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करतात.त्याच्यासह घरी आजी कै.सौ वनिता अरविंद जोशी सातवीत शिकणारी वेदची लहान बहिण श्रृती जोशी असा जोशी परिवार . घरातील वातावरण धार्मिक आणि संस्कारक्षम.एकञित कुटुंब असल्याने वेद याच्यात पुर्वीपासून समंजसपणा आला आहे.
तसं पाहिलं तर घरात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही.माञ ,तरीही वेदने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहे.त्याचे वडील अश्विनीकुमार पौरोहित्य करुन आपल्या दोन मुलांना अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण देत आहेत.त्याचबरोबर घराचा चरितार्थही चालवत आहेत.या दोन्ही मुलांना आपल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे.त्यामुळे तळमळीने ती दोघंही शिक्षण घेत आहेत.
संस्कृत भाषा तर वेदची मायबोलीच म्हणायला हवी.पण विज्ञान ,गणित हे त्याचे विशेष आवडते विषय आहेत.पठण आणि वक्तृत्व यातही त्याचे विशेष कौशल्य आहे.वरवडेसारख्या ग्रामीण भागात राहून शिक्षकांच्या शिकवणीवरच त्याने हे उत्सुंग यश मिळविले आहे.एवढेच नाही तर पुस्तकी अभ्यासक्रम आत्मसात करतानाच पठण स्पर्धा,बालवैज्ञानिक स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ,
विज्ञान प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धांमध्ये तो दरवर्षी सहभागी होत असतो.या स्पर्धांमध्ये अनेकवेळा क्रमांक पटकावले आहेत तो सातवीत असतानाच त्याची वरवडे विद्यालय ,भागशाळा खंडाळाने आदर्श विद्यार्थी म्हणून त्याची निवड केली.एवढेच नव्हे तर वेदविद्या संवर्धन मंडळ ( देवगड,जि सिंधुदुर्ग ) यांनीही आदर्श विद्यार्थी म्हणून वेदचा गौरव केला आहे.वेद याचा संस्कृत व्याकरण अभ्यासक्रम शिकण्याचा मानस आहे यासाठी तो गोवा येथे जाणार आहे.
दहावी परिक्षेचा वरवडे हायस्कूलचा निकाल 99% लागला यामध्ये वेद हा संपुर्ण संस्कृत विषयाचा एकमेव विद्यार्थी आहे त्याने संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले.
वेद इतर गुणांमध्येही पारंगत आहे. अभ्यासात तेज असलेल्या वेदने राष्ट्रभाषा प्राथमिक परिक्षाही विशेष श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.विविध शाळांमध्ये झालेल्या पठण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविले आहे सहावी आणि नववीत त्याने डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही सहभाग घेतला.आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आजोबांचा संगीतकलेचा वारसा वेदने आपल्या वडिलांकडून संस्कृतचा वारसा उचलला आहे तर आजोबांकडून संगीताचा.त्यामुळे त्याला शास्ञीय गायन,वादन याची आवड आहे.त्याने गायनाची प्रारंभिक परिक्षा विशेष श्रेणीत तर प्रवेशिका प्रथम परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.धुव्रा संस्कृत महोत्सवात सहभागी होत संस्कृत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

*दखल न्यूज भारत*