दहेगाव मध्ये गरोदर विवाहिता आढळली कोरोना पाँजिटीव आजुबाजुची किराणा किंवा सलुन ची दुकाने कोरोनाचे हाँट स्पाँट बनण्याची भिती?

468

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

दहेगाव -खापरखेडा / सावनेर(नागपुर)
सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव मध्ये आता एक 30 वर्षिय गरोदर विवाहित महिला पाँजिटीव निघाली असुन ग्रा पं. सरपंच प्रकाश गजभिये तसेच पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असुन त्यांनी ती विवाहित गरोदर महिला जिथे राहते ते घर सेनिट्राईज केले आहे.
प्राप्त माहितीनुसार ही विवाहित गरोदर महिला लाँक डाऊन पुर्वीच आपल्या आईवडिलांकडे डिलीव्हरी करिता आली होती. तिचे पती अकोला येथे डॉक्टर आहेत. तसेच या महिलेचा उपचार नागपुरातील डॉ. शेंबेकर यांचेकडे जात होती. डिलीव्हरी पुर्वी या विवाहित महिलेने आपली कोव्हीड टेस्ट धुर्व पैथोलॉजी लैब मध्ये केली तिथे ती पाँजिटीव असल्याचे रिपोर्ट दहेगाव ग्रा. पं ला पाठवले. डॉ. शेंबेकर यांच्या हाँस्पिटल मध्ये कुणाच्या तरी संपर्कात आल्यामुळेच या विवाहित गरोदर महिलेला कोरोना चा संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरपंच प्रकाश गजभिये यांनी घटनास्थळी पोहोचुन कर्मचारी यांचेकडुन संपुर्ण एरिया सेनिट्राईज करुन एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महिलेला वैद्यकीय अधिकारी पाटणसावंगी यांनी मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या पाँजिटीव महिलेच्या घरात 5 जण नातेवाईक असुन ते हाय रिस्क आहेत. तर इतर 25 जण लो रिस्क मध्ये असल्याचे सरपंच प्रकाश गजभिये यांनी सांगितले.
बातमी लिहीपर्यंत सावनेर तहसिल कार्यालयांकडून तसेच खापरखेडा पोलिस स्टेशन कडुन कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित झाले नाहीत हे विशेष. यावरुन सावनेर तहसिल व खापरखेडा पोलिस स्टेशन किती गंभीर आहे हे दिसून येते हे मात्र नक्की.