वणी तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढलेय! दोन दिवसात पाच आत्महत्या, चौघांचा मृत्यु तर ऐकाची मुत्यशी झुंज

352

वणी : परशुराम पोटे

वणी तालुक्यात आत्महत्याचे प्रमाण वाढले असुन दोन दिवसात चक्क पाच आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत.
यात विविध घटनेत चार व्यक्तींनी आत्महत्या केली असुन पाचवा व्यक्ती चंद्रपुर येथे मुत्युषी झुजं देत आहे. यातील प्रथम घटना बुधवारी दि.५ आँगष्ट ला सकाळी १० वाजताची असुन मुर्धोनी येथील संजय भाऊराव पारखी( ४५) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तर चिखलगाव येथील किसन रामदास डाहुले(४०) याने राहत्या घरी कोनी नसताना छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. तर राञी ११:३० वाजताच्या दरम्यान नांदेपेरा येथील रहिवाशी गजानन शंकर देठे (५०) यांनी राहत्या घरी विषारी औषध प्रशान केले.त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता मृत्यु घोषीत करून शवविच्छेदन केले आहे. तर गणेशपुर येथील राकेश रमेश मांडवगण(३१) याने राञी १० वाजता दरम्यान विषारी औषध प्रशान केले. त्याला लगेच वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती गंभिर असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे रेफर केले असून तो जीवन मुत्युशी झुंज देत आहे.तर आज दि.६ आँगष्टला सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान तालुक्यातील वडगाव (टिप) येथिल मारोती नथ्थु झाडे(३८) यांनी विषारी औषध प्राषन करुन आत्महत्या केली. तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होत असल्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाने जनजाग्रुती करणे गरजेचे आहे.