गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा अपहार प्रकरणी आरोपी गजाआड बनावट धनादेशाद्वारे विविध खात्यात वळती केली होती रक्कम पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

885

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जलसंधारण विभागाच्या युनियन बँकच्या शाखेतून बनावट धनादेश तयार करून २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये विविध खात्यात वळते करून अपहार केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी रॅकेट उघडे पाडले आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्नेहदिप श्रीराम सोनी (४७) रा. नंदनवन केडीके काॅलेज नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल (५१) रा. रेड्डी ता. कुरई जि. शिवनी, सुदीप श्रीराम सोनी (५१) रा. नाईक रोड, महाल नागपूर, अमित मनोहर अग्नीहोत्री (३५) रा. धनगवळी नगर हुडकेश्वर नागपूर, अतुल देवीदास डुकरे (४२) रा. प्लाट क्रमांक ६६ आशिर्वाद नगर नागपूर, विनोद मंगलसिंग प्रधान (४७) रा. करडी. ता. मोहाडी जि. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. सदर आरोपीना काल ५ ऑगस्ट २०२० रोजी रोजी ताब्यात घेवून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्हयाची व्यापकता व गांभीर्य लक्षात घेवून आरोपीतांना १० दिवासाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयाचे घटनाक्रमादरम्यान सक्रिय असलेल्या व आरोपीतांना वेळोवेळी माहिती पुरविणाऱ्या इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण विभागाचे युनीअन बॅक शाखा गडचिरोली येथील बचत खाते 592802010011800 क्रमांकावरील ३ जून २०१९ रोजी आरोपींनी जलसंधारण अधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कार्यालयीन शिक्के मारून आर.टी.जी.एस संबधात पत्र तसेच बनावट धनादेश क्रमांक 12025801 प्रमाणे तयार करून नमुद क्रमांकाचे बॅक खात्यामध्ये शिल्लक असलेल्या एकुण ६ कोटी २२ लाख ५९ हजार ३५१ रूपये रकमेपैकी एकुण २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये विड्राल करून आर.टी.जी.एस च्या माध्यमाने रामदुत कन्स्ट्रक्शन कंपनी खाते क्रमांक 60325616275, निर्वाना बिल्डर्स खाते क्रमांक 22411110003022, चिरंजीवी ट्रेंडलींक खाते क्रमांक 50487333227 , उत्कर्ष निर्माण कंपनी खाते क्रमांक 000101780002215 , पवनसुत कन्स्ट्रक्शन कंपनी खाते क्रमांक 60330938089 इत्यादी बॅंक खात्यामधून वळती करून ३ जून २०१९ ते १२ जून २०१९ दरम्यानच्या कालावधीत वरील प्रमाणे नमुद शासकीय रकमेचा अपहार केला असल्याबातत लक्षात आल्याने त्याबाबत लेखी तक्रारीवरून १९ सप्टेंबर २०१९ रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली येथे भांदवी कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाची व्यापकता पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय गडचिरोली यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलिस अधिक्षक शैलश बलकवडे यांच्या नेतृत्वात अपर पोलिस अधिक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून गुन्हयाचे तपास संदर्भात मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत अधिकरी व कर्मचारी यांनी अत्यंत संयमाने तपासचे नियोजन करून अत्यंत चिकाटीने तपास करून अपहारीत घटनेच्या संबधाने संबधित विभागाकडे वेळोवळी पाठपूरावा करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती प्राप्त करून घेतली. सर्व बाबींची माहिती संकलीत झाल्यानंतर पोलिस अधिक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात गुन्हयातील आरोपीच्या अटक प्रक्रियेसंबंधाने ६ वेगवेगळे स्वतंत्र पोलिस पथक तयार करण्यात आले. अपर पोलिस अधिक्षक प्रशासन यांनी सर्व तपास पथकांचा पाठपुरावा करून त्यांचे निर्देशाप्रमाणे मध्यप्रदेश राज्यातील रेड्डी जि. शिवनी तसेच भंडारा, नागपूर येथे एकाच वेळी छापे टाकुण मुख्य आरोपीसह इतर ५ सहकारी आरोपीतांना वेगवेगळया ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आले. एकमेकांसमोर येताच आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक उल्हास पी. भुसारी, सहा. पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे, पोलिस उप निरीक्षक भागवत कदम, महिला पोलिस उप निरीक्षक पुनम जगताप, तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी यांनी केलेली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक विपीन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण, पोउपनि स्वप्नील गोपाले यांचे आरोपी अटक करण्यात विशेष सहकार्य लाभले.
अपर पोलिस अधिक्षक मोहीत कुमार गर्ग सो. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभरी अधिकारी पोनि उल्हास भुसारी यांनी व त्यांच्या संपूर्ण टिमने गुन्हा दाखल झाल्यापासून तो उघडकीस आणण्याकरीता घेतलेली मेहनत, तांत्रीक पुरावा जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न यांना यश येवून आज गडचिरोली पोलिस दलाने आरोपी गजागाड करण्यात यश प्राप्त केले असल्याचे सांगुन पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे सो. यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतूक व अभिंनदन करत संपर्ण तपास पथकास २५ हजार रूपयांचे पारीतोषीक जाहीर केले आहे.