जिल्हयात 2 कोरोनामुक्त तर नवीन 4 कोरोना बाधित

118

 

कार्यकारी संपादिका रोशनी बैस

गडचिरोली (जिमाक) : गडचिरोली व वडसा येथील प्रत्येकी एक एक रूग्ण आज कोरोनामुक्त झाले. तर आज जिल्हयात नवीन 4 कोरोना बाधित आढळून आले आहे. यामध्ये गडचिरोली येथील पोलीस कॉलनीतील एक पोलीस कर्मचारी, मूलचेरा येथील एक आरोग्य सेविका, धानोरा तालुक्यातील 2 यामध्ये पोलीस स्टेशन धानोरा येथील एक पोलीस व नागपूर येथे उपचारासाठी गेलेला तसेच त्याच ठिकाणी ट्रुनॅट तपासणी केलाला एकजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. यानुसार गडचिरोली 1, मूलचेरा 1 व धानोरा 2 असे 4 जण आज कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 160 झाली. तर एकुण बाधित संख्या 671 झाली. आत्तापर्यंत एकूण 510 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.