Home कोरोना  भंडारा जिल्ह्यात आज 4 रुग्णांना डिस्चार्ज 24 नवे रुग्ण; पॉझिटिव्ह रुग्णाची...

भंडारा जिल्ह्यात आज 4 रुग्णांना डिस्चार्ज 24 नवे रुग्ण; पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 342; क्रियाशील रुग्ण 103

147

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज

भंडारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात आज 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 24 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 21, लाखनी 1 व मोहाडी तालुक्यातील 2 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 231 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 342 झाली असून 103 क्रियाशील रुग्ण तर 6 संदर्भित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे.
आज 6 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 117 व्यक्ती भरती असून 791 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1975 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 34 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 1941 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Previous articleकोराडी चे राममंदिर बावनकुळे यांनीच पाडले आहे; जे फोटो राममंदिर असल्याचा ते सांगतात, ते हनुमान मंदिरच आहे – ज्ञानेश्वर कंभाले (कोराडी जि. प. सदस्य)
Next articleजिल्हयात 2 कोरोनामुक्त तर नवीन 4 कोरोना बाधित