कोराडी चे राममंदिर बावनकुळे यांनीच पाडले आहे; जे फोटो राममंदिर असल्याचा ते सांगतात, ते हनुमान मंदिरच आहे – ज्ञानेश्वर कंभाले (कोराडी जि. प. सदस्य)

717

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर : 6 आँगस्ट 2020
कोराडीचे राम मंदिर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाडले आहे ते. आता ते खोटे बोलत आहे ते ज्या मंदिराचा फोटो खुलासा देताना ते प्रसिद्ध करीत आहे ते राममंदिर नसून जुने हनुमान मंदिर आहे असा स्पष्ट आरोप कोराडी जि प. सर्कल चे जि. प. सदस्य तथा कामठी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष ज्ञानेश्वर (नानाभाऊ) कंभाले यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
नानाभाऊ कंभाले पुढे म्हणाले की, बावनकुळे यांनी कोराडी मंदिर परिसरातील जुने देवीचे कुंड तोडले आहेत. कुंडातील देवी देवतांच्या मुर्ती उपडुन फेकल्या आहेत. तसेच शितला माता, भैरो देवाचे मंदिर, शिवमंदिर, काली माता मंदिर इत्यादी शेकडो वर्ष जुने मंदिर संपूर्ण जुन्या मुर्ती भंग केल्या आहे.
कोराडी जगदंबा देवस्थान च्या बाजुला तलावाच्या काठावर असलेल्या श्रीराम मंदिरास तोडल्यावरुन सध्या चांगलेच वातावरण तापले असुन पुन्हा एकदा भाजपा चे दिग्गज नेते चंद्रशेखर बावनकुळे व त्यांचे परंपरागत राजकीय वैरी जि. प. सदस्य नानाभाऊ कंभाले हे आमने-सामने ठाकले आहेत.